शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

उड्डाणपूल, रस्ते कामांतून कोटींची उड्डाणे

By admin | Updated: February 19, 2016 01:20 IST

महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीची सध्या कोटीच्या कोटी उड्डाणे सुरू आहेत. ही उड्डाणे विशेषत:

पिंपरी : महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीची सध्या कोटीच्या कोटी उड्डाणे सुरू आहेत. ही उड्डाणे विशेषत: मोठ्या खर्चाचे उड्डाणपूल आणि रस्ते यांच्या माध्यमातूनच घेतली जात आहेत. गेल्या पंधरा दिवसांत स्थायी समितीने तब्बल १८० कोटींच्या कामांना मंजुरी दिली. स्थायीच्या कोट्यवधींच्या उड्डाणांमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. स्थायी समितीचे आठ सदस्य या महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यामुळे मोठ्या खर्चाचे विषय मंजुरीचा सपाटा सुरू आहे. गेल्या दोन आठवड्यांतील स्थायीच्या सभेत पावणेदोनशे कोटींच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. अधिक खर्चाचे विषय समितीपुढे ठेवण्यासाठी सदस्यांची धडपड सुरू आहे. सभा सुरू होण्यास चार-चार तास उशीर होत आहे. यामुळे अधिकाऱ्यांनाही ताटकळत बसावे लागत आहे. गेले दोन आठवडे झाले, हाच प्रकार पाहावयास मिळत आहे. अखेरच्या टप्प्यात जोरदार बॅटिंग करण्याच्याच इराद्याने सदस्य येत असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. मागील आठवड्यातील ११ फेबु्रवारीला झालेल्या स्थायी समिती सभेत अजेंड्यावरील ९३ आणि ऐनवेळचे तब्बल ५५ अशा एकूण १४५ विषयांना वीस मिनिटांत मंजुरी देण्यात आली. यामध्ये ऐनवेळच्या तब्बल ६० कोटींच्या खर्चाचा, तर अजेंड्यावरील सुमारे २० कोटींच्या खर्चाच्या विषयांचा समावेश आहे. अधिकाधिक खर्चाचे विषय येण्यासाठी सदस्यांनी आयुक्तांचीही भेट घेतली. वाकड अंडरपास ते महापालिका हद्दीपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी तब्बल सतरा कोटी, चऱ्होली येथे मैलाशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी १९ कोटी, ताथवडे येथे मैलाशुद्धीकरण केंद्र व पंप हाऊस उभारणे, जुन्या पंप हाऊसचे मजबुतीकरण करणे या कामासाठी येणाऱ्या १५ कोटी या खर्चाचा समावेश आहे. या खर्चासह अजेंड्यावरील तब्बल २० कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली. अशा प्रकारे ११ फेबु्रवारीच्या सभेत स्थायीने सुमारे ऐंशी कोटींच्या विकासकामांचा फडशा पाडला. स्थायी समितीच्या १७ फेब्रुवारीला झालेल्या सभेतही स्थायीने सुमारे शंभर कोटींचा ‘विकास’ केला. यात उड्डाणपुलांच्या मोठ्या खर्चाच्या विषयांचा समावेश आहे. निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक या दरम्यानच्या रस्त्यावरील लोहमार्गावर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यासाठी येणाऱ्या ७७ कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली. यासह दापोडीतील हॅरिस ब्रीज येथे उड्डाणपूल उभारण्यात येणार असून, यासाठी येणाऱ्या २२ कोटींच्या खर्चासही मान्यता देण्यात आली. अशा प्रकारे दोन उड्डाणपुलांच्या कामासाठी बुधवारी तब्बल शंभर कोटींचे ‘उड्डाण’ घेण्यात आले. हे कमी म्हणून की काय, भोसरीतील शीतलबाग येथील पादचारी पुलासाठी येणाऱ्या वाढीव खर्चासही पुन्हा एकदा मुक्तहस्ते मंजुरी देण्यात आली. सुरुवातीला ७१ लाख असलेला खर्च तब्बल साडेसात कोटींवर पोहोचला आहे. अवघ्या साडेतीन वर्षांत हा पादचारी पूल साडेसात कोटींवर पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. स्थायीने दोन आठवड्यांपासून जरा जास्तच वेगाने विकासकामांसाठी ‘धावपळ’ सुरू केली आहे. दोन वर्षांचा कार्यकाल संपत आल्याने सदस्यांची जरा जास्त ‘धावपळ’ सुरू असल्याचे चित्र आहे.(प्रतिनिधी)