शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मुळा, पवना नदीला पूर; झोपड्यांतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 06:30 IST

मावळ आणि मुळशी भागात पावसाची संततधार सुरू आहे. मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने जुनी सांगवी येथील मुळा नदीपात्रा शेजारी असलेल्या मुळानगर झोपडपट्टीत पाणी शिरले

पिंपरी : मावळ आणि मुळशी भागात पावसाची संततधार सुरू आहे. मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने जुनी सांगवी येथील मुळा नदीपात्रा शेजारी असलेल्या मुळानगर झोपडपट्टीत पाणी शिरले असून महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशामक विभागाच्या अधिकाºयांनी २० झोपडपट्टयांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलिवले. तसेच पवना आणि इंद्रायणी नद्यांचीही पाणीपातळी वाढली आहे.आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. मावळ आणि मुळशीतील धरणे फुल भरली आहेत. पिंपरी-चिंचवड परिसराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण फुल झाल्याने मंगळवारपासून विसर्ग वाढविण्यात आला आहे. मावळातील वलवण, भुशी, लोणावळा डॅम फुल झाले आहेत. भामा आसखेडही फुल झाले आहे. पवना, मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. मंगळवारी मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तीस हजार क्युसेक पाणी मुळा नदीत सोडले आहे. त्यामुळे सांगवी येथे मुळा नदी पात्रात असलेल्या मुळानगर झोपडपट्टीत पाणी शिरले होते. पवनानदीची पाणीपातळी वाढली आहे. धरणातून सात हजार आठशेक्युसेक पाणी सोडले आहे. त्यामुळे चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरात पाणी शिरले होते. पिंपरीतील नदीकाठच्या परिसरात सर्तकतेचा इशारा दिला आहे.महापालिकेच्या सतर्क असलेल्या आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशामक विभागाच्या अधिकाºयांनी सांगवीतील मुळानगर भागात जाऊन त्वरित झोपडपट्टीतील पन्नास नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले. हे कार्य रात्री दोन वाजेपर्यंत सुरू होते. या नागरिकांची मुळानगर आणि जुनी सांगवीतील नागरिकांना अहिल्यादेवी होळकर शाळेत तात्पुरत्या स्वरूपात सोय केली आहे. या ठिकाणी जवळपास दीडशे झोपडपटट््या आहेत. पालिकेच्या शाळेत त्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच दापोडी गुलाबनगर भागातील बाधित १४ झोपडट्ट््यांतील नागरिकांना हुतात्मा भगतसिंग शाळेत स्थलांतरित केले आहे.पावसाळा सुरू होताच आपत्तीनिवारण कक्ष सज्ज झाला आहे. मुळानगर झोपडपट्टीत मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पाणी शिरले होते. आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाºयांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. पालिकेने त्यांची तात्पुरती राहण्याची सोय देखील केली आहे. आपण स्वत: त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे. - श्रावण हर्डीकर, आयुक्त