शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कामगारांवरून झाडाझडती; महापालिका प्रशासनाच्या अनियमिततेवर ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 05:27 IST

महापालिकेतील अधिका-यांच्या वादग्रस्त पदोन्नती, तसेच मागासवर्गीयांचा अनुशेष नियमानुसार भरला जात नाही, अशा विविध मुद्यांवरून राज्य शासनाच्या अनुसूचित जाती आयोग कल्याण समितीने महापालिका प्रशासनाची चांगलीच झाडाझडती घेतली.

पिंपरी : महापालिकेतील अधिका-यांच्या वादग्रस्त पदोन्नती, तसेच मागासवर्गीयांचा अनुशेष नियमानुसार भरला जात नाही, अशा विविध मुद्यांवरून राज्य शासनाच्या अनुसूचित जाती आयोग कल्याण समितीने महापालिका प्रशासनाची चांगलीच झाडाझडती घेतली. कंत्राटी कामगारांची पिळवणूक करू नये, असेही समितीने महापालिका प्रशासनाला सुनावले आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वच विभागांतील अनुसूचित जाती प्रवर्गातील अधिकाºयांची पदोन्नती, बदली, राखीव जागा, अनुशेष आदींची पडताळणी करण्यासाठी राज्य शासनाच्या अनुसूचित जाती आयोग कल्याण समितीने पालिकेत प्रशासनाची बैठक घेतली. समितीचे अध्यक्ष आमदार हरीश पिंपळे, जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये, धनाजी अहिरे, मिलिंद माने, अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार आदींसह एकूण पंधरा आमदार उपस्थित होते.महापालिका प्रशासनातील आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर यांच्यासह सर्वच विभांगातले अधिकारी उपस्थित होते. समितीच्या बैठकीची वेळ दुपारी दोनची होती. ती दोन तास उशिराने सुरू झाली. त्यामुळे स्थायी समितीची चार वाजता होणारी सभा पुढे ढकलावी लागली. दुपारी चारला बैठक सुरू झाली. या वेळी झोपडपट्टी पुनर्वसनासंदर्भातील आराखड्याचे सादरीकरणही झाले.अपात्र व्यक्तीकडे पदभारमहापालिकेतील अधिकाºयांच्या वादग्रस्त पदोन्नती, तसेच मागासवर्गीयांचा अनुशेष नियमानुसार भरला जात नाही, अशा विविध मुद्यांवरून आमदार समितीने प्रशासनाची चांगलीच झाडाझडती घेतली. महापालिका प्रशासनास एक प्रश्नावली देण्यात आली. त्याबाबत आयुक्तांची साक्ष घेण्यात आली. समितीच्या आमदार सदस्यांनी प्रशासनातील अनुसूचित जाती प्रवर्गासाठीचा अनुशेष तपासला. त्यामध्ये अनेक विभागांचा पदभार बेकायदेशीरपणे अपात्र व्यक्तींकडे देण्यात आल्याचे निदर्शनास आले. याबाबत समितीतील आमदारांनी प्रशासनाला विचारणा केली असता प्रशासनाला याबाबत समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.पात्रता नसताना अधिकाºयांना पदोन्नतीपिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थापत्य विभागातील सेवा ज्येष्ठता यादी डावलून अधिकाºयांची पात्रता नसताना त्यांना पदोन्नती दिल्याचा मुद्दा वादग्रस्त ठरला. महापालिकेत स्वच्छतेची कामे कंत्राटी पद्धतीने केली जातात. त्यात मागासवर्गीयांचे प्रमाण अधिक असले तरी ठेकेदार हे कंत्राटी कामगारांची पिळवणूक करतात. पिळवणूक होणार नाही, याबाबत प्रशासनानेही दक्षता घ्यायला हवी, असे प्रशासनास सूचविले. पुढील काळात नवीन पदे कोणती आणि कशी भरली जाणार आहेत, त्यात मागासवर्गीयांचे स्थान आरक्षणाचा विचार केला आहे का? याचीही माहिती घेण्यात आली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड