शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव क्रेनची सायकलस्वार, मोटार, दुचाकी, प्रवासी रिक्षास जोरदार धडक; धडकेत सायकलस्वार वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 02:01 IST

किवळे : विकासनगर येथील मुख्य चौकात भरधाव क्रेनने एक सायकलस्वार, मोटार, दुचाकी, प्रवासी रिक्षास जोरदार धडक देऊन सायकलस्वारास फरफटत नेल्याने झालेल्या अपघातात वृद्धाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अपघात झाला.निवृती बाबूराव सुतार (वय ७५, रा. विकासनगर, किवळे) असे अपघातात मरण पावलेल्या वृद्धाचे नाव आहे. एहसास राय (दत्तवाडी, आकुर्डी) ...

किवळे : विकासनगर येथील मुख्य चौकात भरधाव क्रेनने एक सायकलस्वार, मोटार, दुचाकी, प्रवासी रिक्षास जोरदार धडक देऊन सायकलस्वारास फरफटत नेल्याने झालेल्या अपघातात वृद्धाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अपघात झाला.निवृती बाबूराव सुतार (वय ७५, रा. विकासनगर, किवळे) असे अपघातात मरण पावलेल्या वृद्धाचे नाव आहे. एहसास राय (दत्तवाडी, आकुर्डी) या क्रेनचालकास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.अपघातस्थळी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास देहूरोडहून किवळेकडे जाणाºया भरधाव क्रेनने (एमएच १४ सीएम ३७३) विकासनगर येथील छत्रपती शिवाजी चौकात सायकलस्वारास धडक दिल्यानंतर चौकातील स्वागत कमान, दुकानासमोर उभ्या दुचाकी (एमएच ०१ एके ९३०७), मोटार (एमएच १४ जीए ७९५८), रिक्षा (एमएच १४ सीयू २०१३) या तीन वाहनांनाही धडकून नुकसान केले. अपघातात गंभीर जखमी सुतार यांना देहूरोड येथील खासगी रुग्णालयात नेले असता उपचारापर्ू्वीच ते मरण पावल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. संबंधित क्रेनचे ब्रेक फेल झाले असल्याची चर्चा होती.