शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर, लालटोपीनगरची दुसरी यादी लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 04:07 IST

झोपडपट्टी विकास प्राधिकरणाच्या (एसआरए) माध्यमातून खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या पुढाकाराने शहरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. चिंचवड, साईबाबानगर येथील पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी तयार झाली असून, नागरिकांच्या सूचना, हरकतींसाठी ही यादी त्या परिसरात लावली आहे.

पिंपरी : झोपडपट्टी विकास प्राधिकरणाच्या (एसआरए) माध्यमातून खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या पुढाकाराने शहरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. चिंचवड, साईबाबानगर येथील पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी तयार झाली असून, नागरिकांच्या सूचना, हरकतींसाठी ही यादी त्या परिसरात लावली आहे. काही दिवसांतच लालटोपीनगरची दुसरी यादी लावली जाणार आहे. अपात्र ठरलेल्यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यास ते पात्र ठरू शकणार आहेत, अशी माहिती एसआरएच्या अधिकाºयांनी दिली.साईबाबानगरमध्ये एकूण झोपड्यांची संख्या ४२६ इतकी आहे. त्यातील निवासी झोपड्यांची संख्या ३५९ इतकी आहे. पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची संख्या २१२ तर अपात्र ठरलेल्यांची संख्या १४७ इतकी आहे. पुनर्वसन योजनेस संमती दिलेल्या झोपडीधारकांची संख्या २१२ इतकी आहे. ही यादी लावल्यानंतर साईबाबानगरमधील झोपडीधारकांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या संपर्क कार्यालयाकडे धाव घेतली.आपले नाव अपात्र यादीत नाही ना? याची खात्री करून घेऊ लागले आहेत. ज्या कारणास्तव झोपडीधारक अपात्र ठरले, त्यासंबंधीच्या कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्रुटी दूर झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांमध्ये त्यांचे नाव येऊ शकते, अशी माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. साईबाबानगर येथील कार्यकर्ते मारुती पंद्री यांनी झोपडीधारकांची समजूत घातली. अधिकाधिक झोपडीधारकांना घरकुल मिळावे, ज्यांच्याकडे आवश्यक ते पुरावे आहेत, जे पात्र ठरू शकतात, या करिता पाठपुरावा करणार असल्याचे पंद्री यांनी झोपडीधारकांना सांगितले.लालटोपीनगरची दुसरी यादी लवकरचमोरवाडीतील लालटोपीनगरमधील झोपडीधारकांची दुसरी यादी लवकरच जाहीर होणार आहे. सुमारे ११३० लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल. युद्धपातळीवर लालटोपीनगरच्या पुनर्वसन योजनेचे काम सुरू आहे. एसआरएअंतर्गत हा पहिलाच प्रकल्प शहरात साकारत आहे. गवळीमाथा येथील झोपडपट्टीचे एसआरएअंतर्गत पुनर्वसन करण्याचे नियोजन आहे. तेथील झोपडीधारकांचेही सर्व्हेक्षण झाले आहे.

टॅग्स :Homeघर