शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

हाताची घडी तोंडावर बोट!

By admin | Updated: December 22, 2015 01:13 IST

तुमच्या आगारातील बस किती? तुमच्या डेपो अंतर्गत किती बसथांबे येतात? दररोज नेमक्या किती बसेसचे संचलन होते? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे न येणाऱ्या

पुणे : तुमच्या आगारातील बस किती? तुमच्या डेपो अंतर्गत किती बसथांबे येतात? दररोज नेमक्या किती बसेसचे संचलन होते? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे न येणाऱ्या पीएमपीच्या आठ डेपो मॅनेजरला बैठकीत तब्बल दहा मिनिटे उभे करण्याची शिक्षा पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी एका बैठकीत नुकतीच केली. डेपोंचा आढावा घेण्यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत दहा डेपो मॅनेजरमधील आठ डेपो मॅनेजरला आपल्या डेपोंची माहितीच नसल्याने ही शिक्षा करण्याची वेळ आल्याचे या बैठकीस उपस्थित असलेल्या एका बड्या अधिकाऱ्याने सांगितले. मागील आठवड्यात पीएमपीच्या स्वारगेट डेपोतील एका कर्मचाऱ्याचा स्वच्छतागृहात अकस्मात मृत्यू झाल्याने सर्व डेपो मॅनेजरला अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी तसेच खबरदारीचे उपाय घेण्यासाठी कृष्णा यांनी बैठक बोलाविली होती. या बैठकीत मॅनेजरला सूचना देण्यात आल्यानंतर कृष्णा यांनी एका मॅनेजरला तुमच्या अखत्यारित किती बसथांबे येतात, हा प्रश्न विचारला. या डेपो मॅनेजरला उत्तरच देता आले नाही. या वेळी कृष्णा यांनी आणखी दोन प्रश्न विचारले. त्याचेही उत्तर या मॅनेजरला देता आले नाही. हा मॅनेजर दहा मिनिटे उभा राहून इकडे तिकडे पाहत होता. त्यानंतर कृष्णा यांनी पुढच्या मॅनेजरला हेच प्रश्न विचारले. त्यांनाही उत्तर देता येईना, मग तेही उभे. त्यानंतर त्यांनी ओळीने आणखी आठ डेपो मॅनेजरला हे प्रश्न विचारले. त्यामुळे उत्तर न येणारे सहा मॅनेजर आपणहूनच उभे राहिले. तर अवघ्या दोन मॅनेजरनी कृष्णा यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यामुळे त्या मॅनेजरला बसवून इतर आठ मॅनेजरना हाताची घडी घालून या बैठकीत काही काळ उभे करण्यात आले. (प्रतिनिधी)