शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्य दुकानात रेशन मिळेना

By admin | Updated: March 20, 2017 04:20 IST

येथील परिसरात स्वस्त धान्य दुकानदारांच्या मनमानी कारभाराचा फटका ग्राहकांना बसत असून, महिन्यातून केवळ पंधरा

चिखली : येथील परिसरात स्वस्त धान्य दुकानदारांच्या मनमानी कारभाराचा फटका ग्राहकांना बसत असून, महिन्यातून केवळ पंधरा दिवसच धान्य वाटप केले जात आहे. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत असून त्यामुळे बराच ग्राहकांना धान्य मिळेनासे झाले आहे. चिखली परिसरातील मोरेवस्ती कुदळवाडी, जाधववाडी तसेच चिखली गावठाण आदी भागात पूर्वी ५ ते ६ स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरीत होत असे. यातील काही दुकानदारांनी काही कारणांमुळे आपापली दुकाने बंद केली असल्या कारणामुळे कित्येक कार्डधारकांचे रेशन बंद झाले आहे. तर काही कार्डधारकांना इतर दुकानदारांकडे वर्ग करण्यात आले आहे. तसेच नवीन नोंदणी करणाऱ्या कार्डधारकांनाही तलाठी कार्यालयातुन रेशनिंगसाठी याच दुकानदारांकडे पाठवले जाते. यामुळे आधीच कार्डधारकांची संख्या जास्त असल्याने सदर दुकानांवर आतिरिक्त कार्डधारकांना धान्य पुरविणे अवघड होत आहे. नविन कार्डधारकांना साठा नसल्याचे सांगून रेशनिंग देण्यास नकार दिला जातो. काही दुकानदार युनीट प्रमाणे धान्य वाटप करत नसल्याच्या तक्रारी ग्राहक करत आहेत. कित्येक ग्राहकांना तुमचे रेशन वरुन बंद केले असल्याची सबब सांगीतली जाते. सध्या चिखलीत दोन दुकांनामर्फत धान्य वाटप केले जात आहे. मात्र या दुकानांतुन महीन्यातून केवळ पंधराच दिवस धान्य वाटप केले जात असून दुकानदार त्यांच्या सवडी नुसार वेगवेगळ्या वेळेत धान्य वाटप करत आहेत. (वार्ताहर)