शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या कारणावरून एकाचे अपहरण केल्याप्रकरणी ६ जणांवर कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 17:42 IST

जमीन आपल्या नावावर करण्याप्रकरणी एकाचे अपहरण करून त्याला दमदाटी, शिवीगाळ व मारहाण केल्याने त्याने भीतीपोटी विषारी औषध घेतल्याने सहा जणांवर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसहा जणांवर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलनायगाव येथील जमीन गट नं. २८० मध्ये दाखल केलेली हरकत मागे घ्यावी या कारणावरून मारहाण

कामशेत : येथील नायगावमध्ये एकाची जमीन आपल्या नावावर करण्याप्रकरणी एकाचे अपहरण करून त्याला दमदाटी, शिवीगाळ व मारहाण केल्याने त्याने भीतीपोटी विषारी औषध घेतल्याने सहा जणांवर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी शंकर विठोबा वावरे (वय ५०, रा. नायगाव मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर विठोबा वावरे (वय ५०, रा. नायगाव मावळ) यांची नायगाव मावळ येथील गट नं. २८० मध्ये ३८.२५ आर इतके क्षेत्र असून ते त्यांचा मुलगा सोमनाथ शंकर वावरे याच्या नावे आहे. सोमनाथ यास रवी वाकडकर (रा. वाकड, पुणे) आणि सचिन जगदाळे (तळेगाव दाभाडे) यांनी दारू पाजून व आमिष दाखवून दमदाटीच्या जोरावर नवनाथ ज्ञानू गायखे (रा. खामशेत मावळ) यास कुलमुखत्यार पत्र करून देण्यास भाग पाडले. तसेच चेतन साहेबराव सोरटे (रा. तळेगाव दाभाडे) यांच्या साक्षीने खरेदीखत करून देण्यास भाग पाडले. यावर सोमनाथ वावरे व कांताबाई विठ्ठल पारखी यांना सदरचे खरेदीखत मान्य नसल्याने त्यांनी खरेदीखतास हरकत नोंद होण्याकरिता नायगाव तलाठी यांच्याकडे अर्ज केला. यावरून सोमनाथ वावरेला हरकत मागे घेण्यासाठी शिवीगाळ, दमदाटी करीत सोमवारी दि. ८ रोजी सायंकाळी चार वाजनेचे सुमारास सोमनाथ वावरे यास चारचाकी वाहनात जबरदस्तीने बसवून त्याचे अपहरण केले. त्याला मारहाण, दमदाटी व शिवीगाळ करून रात्री सात वाजण्याच्या सुमारास नायगाव येथे सोडून दिले. त्यानंतर त्याला उलट्या झाल्या व तो बेशुद्ध झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमनाथने नायगाव येथील जमीन गट नं. २८० मध्ये दाखल केलेली हरकत मागे घ्यावी या कारणावरून त्याला दमदाटी, मारहाण, शिवीगाळ व जबरदस्तीने पळवून नेल्याने या भीतीपोटी सोमनाथने विषारी औषध घेतल्याच्या प्रकाराने त्याचे वडील शंकर वावरे यांनी कामशेत पोलीस ठाण्यात सात जणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी निलेश दत्तात्रय तापकीर, स्वाती निलेश तापकीर (रा. चोवीस वाडी, ता. हवेली), गणेश रमेश पिंपळे (रा. खामशेत मावळ), चेतन साहेबराव सोरटे (रा. तळेगाव) रवी वाकडकर (रा. वाकड पुणे), सचिन जगदाळे (रा. तळेगाव) आणि नवनाथ ज्ञानू गायखे (रा. खामशेत मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र वाळुंजकर करीत आहेत.

टॅग्स :kamshetकामशेतpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड