शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात लढाऊ विमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 06:51 IST

सायन्स पार्क हे विद्यार्थी आणि बालचमूचे आवडते ठिकाण बनले आहे. महापालिकेच्या पुढाकाराने मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्र संचालित केंद्र चिंचवड आॅटो क्लस्टरजवळ सुरू करण्यात आल्यानंतर राज्याच्या

पिंपरी : सायन्स पार्क हे विद्यार्थी आणि बालचमूचे आवडते ठिकाण बनले आहे. महापालिकेच्या पुढाकाराने मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्र संचालित केंद्र चिंचवड आॅटो क्लस्टरजवळ सुरू करण्यात आल्यानंतर राज्याच्या विविध भागांतून विद्यार्थ्यांच्या सहली येऊ लागल्या. पिंपरी-चिंचवडमधील सायन्स पार्कचे महत्त्व वाढू लागल्याने त्या ठिकाणी तारांगण प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असताना, कारगिल युद्धात भारतीय जवानांनी वापरात आणलेले मिग २३ हे लढाऊ विमान शनिवारी सायन्स पार्क आवारात दाखल झाले. हे विमान बालचमूचे आकर्षण ठरणारे असल्याने प्रवेशद्वाराजवळच ते उभे करण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे.महापालिकेच्या पुढाकाराने सुरू केलेल्या विज्ञान केंद्रात अनेक विज्ञान खेळणी आहेत. विद्यार्थी व लहान मुले विज्ञान केंद्रात आल्यानंतर विविध प्रकारच्या विज्ञान खेळण्यांपाशी मुले रमतात. केंद्रात आल्यानंतर त्यांच्यात विज्ञानाबद्दलची जिज्ञासा, कुतूहल दिसून येते. तेथे विज्ञानासंबंधीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे, तसेच शंकांचे निरसन केले जाते. थ्रीडी शो पाहण्याची संधी त्यांना मिळते. तारांगणाचाही त्यांना अनुभव घेता येईल, अशी व्यवस्था त्या ठिकाणी केली होती.छोट्या अंधाºया तंबूत तारांगण निर्माण करून नभांगणातील ग्रह-ताºयांची माहिती त्यांना दिली जात असे. आता तारांगण प्रकल्प स्वतंत्रपणे उभारण्यात येत आहे. भव्य असे तारांगण उभारण्याचे काम सुरू आहे. स्थापत्यविषयक कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. शहरातील सायन्स प्रकल्प पर्यटक, तसेच शहरातील नागरिक, विद्यार्थी यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असताना, शनिवारी दाखल झालेल्या मिग २३ विमानाने त्यात आणखी भर पडली आहे. भारतीय वायुसेनेने हे विमान सायन्स पार्कला भेट दिले आहे. विमानाची किंमत आठ कोटी रुपये आहे. कारगिल युद्धात वापरल्यानंतर हे विमान सद्य:स्थितीत वापरात नव्हते. त्यामुळे विज्ञान केंद्रात प्रदर्शनासाठी हे विमान उपलब्ध करून देण्यात आले आहे.विमान दाखल झाले : अन् लगबग झाली सुरूभारतीय वायुसेनेकडून विमान सायन्स पार्कला उपलब्ध होणार असल्याची माहिती असताना, सायन्स पार्कमध्ये विमान ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यापासून ते अन्य कोणतीच पूर्वतयारी नसल्याचे दिसून आले. विमान तीन भागात येथे आणून ठेवले आहे. जॅकच्या साह्याने हे विमानाचे तुकडे सायन्स पार्कच्या प्रवेशद्वारालगत आणून ठेवण्यात आले आहेत. तर विमान सायन्स पार्कमध्ये आणल्यानंतर ते ठेवण्यासाठी जागेची साफसफाई, खोदकाम केले जात आहे. वास्तविक विमान सायन्स पार्क आवारात येण्यापूर्वी ही तयारी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ऐनवेळी विमान ठेवण्याची तयारी सुरू झाल्याने आगामी काळात हे विमान सायन्स पार्कमधील आकर्षण ठरणार असले, तरी सध्या अडथळा बनले आहे.