शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडमध्ये इनव्हर्टरसाठी पाचव्यांदा मागविल्या निविदा : प्रतिसाद नाहीच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 18:45 IST

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची आकुर्डीत पर्यावरणपूरक इमारत आहे.

ठळक मुद्देप्राधिकरणाचा सौर उर्जा प्रकल्प पाच महिन्यांपासून बंदनिविदा प्रक्रियेत किचकट अटी आणि शर्तींमुळे अडथळे

पिंपरी : पाच महिन्यांपासून इनव्हर्टर बंद पडल्याने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा सौर उर्जा प्रकल्प बंद आहे. सुमारे १२ लाख रुपये किमतीच्या इनव्हर्टरसाठी  निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. गेल्या महिन्यात राबविलेल्या या निविदा प्रक्रियेस केवळ दोनच पुरवठादारांनी प्रतिसाद दिला. मात्र, नियमानुसार किमान तीन पुरवठादारांनी प्रतिसाद देणे आवश्यक आहे. त्यासाठी पुन्हा निविदा मागविण्यात येणार आहेत.पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची आकुर्डीत पर्यावरणपूरक इमारत आहे. या इमारतीसाठी २०१२ मध्ये सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. या प्रकल्पासाठी प्राधिकरणातर्फे नवीन इनव्हर्टरसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पहिल्या आणि दुसऱ्यांदा प्रसिध्द केलेल्या निविदेस एकाही पुरवठादाराकडून प्रतिसाद मिळाला नाही. तिसऱ्यांदा प्रसिध्द केलेल्या निविदेस एका आणि चौथ्यांदा केवळ दोन पुरवठादारांनी प्रतिसाद दिला. नियमानुसार किमान तीन पुरवठादारांनी प्रतिसाद देणे आवश्यक आहे. त्यामुळे दोन पुरवठादारांनी प्रतिसाद देऊनही पुन्हा नव्याने पाचव्यांदा निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 

शासकीय पुरवठादार मिळेनानिविदा प्रक्रियेत किचकट अटी आणि शर्तींमुळे अडथळे येत आहेत. १०० किलोवॅट क्षमतेचे इनव्हर्टर पुरवठा करण्याच्या अनुभवासह पाच वर्षे सुटे भाग पुरविण्यासह त्यांची देखभाल आणि दुरुस्ती अशा विविध अटींचा आणि शर्तींचा यात समावेश आहे. अशा पध्दतीचा शासकीय कामकाजाचा अनुभव असलेला पुरवठादार उपलब्ध होत नसल्याने निविदेसाठी साततत्याने पुनर्प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 

महावितरणच्या विजेचा वापरपाच महिन्यांपासून इनव्हर्टर नसल्याने सौर उर्जा प्रकल्प बंद असून, प्राधिकरणाच्या प्रशासकीय इमारतीसाठी पूर्णपणे महावितरण कंपनीची वीज वापरण्यात येत आहे. त्यासाठी एका महिन्याला सरासरी दीड लाख रुपये बील आकारण्यात येत आहेत. इनव्हर्टरची किंमत सुमारे १२ लाख रुपये आहे. मात्र त्याची खरेदी होत नसल्याने सुमारे सात लाख रुपयांचा भुर्दंड प्राधिकरणाला बसला आहे.

इनव्हर्टरसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेस प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे. नियमानुसार अनुभव आणि कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या पुरवठादारांनी पुढे आले पाहिजे. त्यासाठी पुन्हा निविदा मागविल्या आहेत.- प्रभाकर वसईकर, कार्यकारी अभियंता, विद्युत विभाग, प्राधिकरण

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड