शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूच्या दाढेतून प्रवास, खापरे ओढा पूल केव्हाही कोसळण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 02:55 IST

सांगवी-वडगाव मावळ रस्त्यातील खापरे ओढ्यावरील पूल शेवटच्या घटका मोजत आहे. या अतिधोकादायक पुलाच्या दुरुस्तीअभावी ग्रामस्थांचा मृत्यूच्या दाढेतून प्रवास सुरू आहे. या पुलाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

वडगाव मावळ - सांगवी-वडगाव मावळ रस्त्यातील खापरे ओढ्यावरील पूल शेवटच्या घटका मोजत आहे. या अतिधोकादायक पुलाच्या दुरुस्तीअभावी ग्रामस्थांचा मृत्यूच्या दाढेतून प्रवास सुरू आहे. या पुलाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग कधी येणार, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या अतिधोकादायक पुलावरून वाहतूक सुरू आहे. त्यामुळे पूल कोसळण्याच्या अवस्थेत असून, तो कोसळल्यास सांगवी गावचा संपर्क तुटून ग्रामस्थांना पर्यायी मार्ग उरणार नाही.मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव शहराला जोडणाºया सांगवी रस्त्यातील खापरे ओढ्यावरील पुलाचे दगडी बांधकाम पुणे जिल्हा परिषदेने ५५ वर्षांपूर्वी केले. या पुलाची अनेक वेळा तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. या पुलाचे संरक्षक कठडे तुटले असून, पुलाचा बराच भाग खचला आहे. पूल कधीही कोसळून भीषण अपघात होण्याची भीती आहे.पुलावरून विद्यार्थी, कामगार, दुग्ध व्यावसायिक, शेतकरी व ग्रामस्थांच्या दुचाकी व चारचाकींची वर्दळ सुरू असते. पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने या गावाचा संपर्क तुटतो. काही विद्यार्थी व ग्रामस्थ जीव धोक्यात घालून वाहत्या पाण्यातून ये-जा करतात.रस्ता खड्डेमय : पुढाºयांकडून केवळ आश्वासनपावसाळ्यात रस्ता मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने रस्ता खड्डेमय झाला आहे. निवडणूक काळात केवळ पूल दुरुस्तीच्या घोषणांचे आश्वासन पुढारी देतात. महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्याने मावळ तालुक्यातील ब्रिटिशकालीन व धोकादायक पुलांच्या सुरक्षेच्या धर्तीवर या पुलाची केवळ प्रशासनाकडून पाहणी करून अवजड वाहने जाण्यास मज्जाव केल्याचा सूचनाफलक लावला आहे. मात्र, या फलकाकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. यामुळे दिवसेंदिवस या पुलाची अवस्था जीर्ण झाली असून, हा अतिधोकादायक पूल कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. पुलाच्या दुरुस्तीसाठी वारंवार ग्रामस्थ प्रशासनाकडे मागणी करीत असून, केवळ त्यांच्या पदरी निराशा पडत आहे. गैरसोय होत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी आहे. जीवितहानी झाल्यावरच पुलाची दुरुस्ती करणार का, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या