शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

निगडीपर्यंत मेट्रो करण्यासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 05:03 IST

मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात रविवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. उपोषणात शहरातील विविध सामाजिक संघटनांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.

पिंपरी : मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात रविवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. उपोषणात शहरातील विविध सामाजिक संघटनांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.लाक्षणिक उपोषणात पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ), पोलीस नागरिक मित्र महाराष्ट्र राज्य, ग्राहक पंचायत पिंपरी-चिंचवड, जलदिंडी प्रतिष्ठान पुणे, आस्था सोशल फाउंडेशन, भावसार व्हीजन ‘ई’ पिंपरी-चिंचवड, रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, एसबीआय पेन्शनर असोसिएशन, माउली ज्येष्ठ नागरिक संघ आकुर्डी, फेडरेशन आॅफ घरकुल, संस्कार प्रतिष्ठान पुणे, कै. तुकाराम तनपुरे प्रतिष्ठान आदी संघटनांनी सहभाग घेतला.नगरसेवक अमित गावडे, राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे, नगरसेवक सचिन चिंचवडे, नगरसेवक राजू मिसाळ, नगरसेवक उत्तम केंदळे, नगरसेवक सचिन चिखले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश संघटक विशाल काळभोर, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक राजू गोलांडे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, संजय लंके, अमोल भोईटे, सामाजिक कार्यकर्ते गुलाब सोनवणे आदींनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून पाठिंबा दिला.पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत असावी, या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमच्या सदस्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन वेळा भेट घेतली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. पालकमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यात पुणे मेट्रो निगडीपर्यंत जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे नागरिकांची मोठी निराशा झाली आहे. पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यासाठी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ) व अन्य संघटनांच्या वतीने मागील दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात येत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMetroमेट्रो