शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
अब्जाधीश असूनही पान मसाल्याची जाहिरात का? यूट्यूबर ध्रुव राठीचे शाहरुख खानला गंभीर प्रश्न; पैशांचा हिशोब सांगितला
3
मोठी गंमत! उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन; गेल्यावर्षीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली...  
4
त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर पत्नीला कायमचं संपवलं; इंजेक्शन देऊन पतीनेच केले खतरनाक कृत्य
5
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
6
जहीर इकबालने कॅमेऱ्यासमोरच सोनाक्षीच्या बेबी बंपवर ठेवला हात अन्... Video व्हायरल
7
दिवाळी २०२५: लक्ष्मी देवीला घरी आणायचा विचार करताय? ‘या’ गोष्टी करा; स्थापना नियम, योग्य दिशा
8
भारताची रशियाकडून मोठी खरेदी; स्वस्त तेल खरेदीत भारत दुसऱ्या क्रमांकावर, मग पहिलं कोण?
9
शेअर बाजाराची धमाकेदार सुरुवात, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; Nifty २५,४०० च्या वर, खासगी बँकांच्या शेअर्समध्ये खरेदी
10
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
11
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
12
BSNLची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ १ रुपयांत महिनाभर चालेल इंटरनेट; सोबतच मिळणार अनलिमिटेड कॉलिंगही, पाहा
13
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
14
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
15
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
16
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
17
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
18
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
19
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
20
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...

बनावट कागदपत्रे करणारी ‘आरटीओ एजंट’ची टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 20:43 IST

परिवहन विभागाकडून रिक्षा परमिट मिळविण्यासाठी पोलिसांचे बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तयार करणाºया टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून बनावट सही आणि शिक्क्याची तसेच वेगवेगळ्या मजकुराची ८८ प्रकरणे जप्त करण्यात आली आहेत.

पिंपरी : परिवहन विभागाकडून रिक्षा परमिट मिळविण्यासाठी पोलिसांचे बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तयार करणाºया टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून बनावट सही आणि शिक्क्याची तसेच वेगवेगळ्या मजकुराची ८८ प्रकरणे जप्त करण्यात आली आहेत. १८ लाख रुपयांचा ऐवज या टोळीकडून जप्त केला आहे. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक भीमराव जोगदंड (वय ३७, रा. निगडी), बालाजी अशोक माशाळकर (वय ४०, रा. काळेवाडी), सचिन महादू साळवे (वय ३५, रा. तळवडे), मुकुंद दत्तू पवार (वय ३०, रा. निगडी), रामदास मच्छिंद्र हानपुडे (वय ३५, रा. चिखली), किरण रामभाऊ ढोबळे (वय २६, रा. भोसरी), खेतमल नामदेव पाटील (वय ३६, रा. काळेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना शनिवारपर्यंत (दि. २४) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील चारित्र्य पडताळणी विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील पिंजण यांना रिक्षा परमिटसाठी लागणारे पोलिसांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळाले. त्यावरून पिंपरी-चिंचवड आरटीओ येथे काहीजण स्वयंघोषित एजंट म्हणून काम करत असून ते पोलिसांचे बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देत आहेत, अशी खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली. एजंटच्या स्वयंघोषित टोळीने पोलीस निरीक्षक सुनील पिंजण यांची बनावट सही व पोलीस आयुक्तालयाचा बनावट शिक्का तयार केला आहे. त्याद्वारे ते बनावट कागदपत्रे तयार करून रिक्षा परमिटसाठी त्याचा वापर करीत आहेत. या बदल्यात एका परमिट धारकाकडून १५ हजार ते ८० हजारांपर्यंत ही टोळी पैसे उकळत आहे. हा प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने संबंधित एजंटची माहिती काढली. तसेच सुरुवातीला तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांची चौकशी करून आणखी चार जणांना ताब्यात घेतले.  सात जणांकडून बनावट सही व शिक्क्याची वेगवेगळ्या मजकुराची ८८ बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रे जप्त केली. तसेच काही शाळांचे शाळा सोडल्याचे कोरे दाखले, मुख्याध्यापकांच्या सहीचे कोरे दाखले, काही परिपूर्ण सही शिक्क्याचे दाखले, तहसीलदारांचे रहिवासी प्रमाणपत्र आढळून आले. पोलिसांनी आरोपींकडून चार वाहने, संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर असा १८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, चारित्र्य पडताळणी (विशेष शाखा) विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील पिंजन, तसेच युनिट एककडील सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस कर्मचारी रवींद्र राठोड, शिवाजी कानडे, काळू कोकाटे, अमित गायकवाड, महेंद्र तातळे, अंजनराव सोडगीर, मनोजकुमार कमले, प्रवीण पाटील, विशाल भोईर, गणेश सावंत, प्रवीण मोरे, सचिन मोरे, तानाजी पानसरे, सायबर विभागातील नाजुका हुलावळे, नीतेश बिचेवार यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसPoliceपोलिस