शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष दारू विक्रेत्यांचे उजाडतेय भाग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 02:46 IST

विक्रेते म्हणतात, स्थानिक पोलीस घेतात महिन्याला पंधरा हजार

कामशेत : मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारुविक्री गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. इंद्रायणी नदी अथवा पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी रोज हजारो लिटर गावठी दारूची निर्मिती होत असून, ती परिसरात ठिकठिकाणी विक्री केली जात आहे. स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन, पोलीस पाटील आदींचे याकडे दुर्लक्ष होत आहे. राज्य उत्पादनशुल्क विभाग दोन तालुके असून, त्यानुसार मनुष्यबळ नसल्याचे कारण देत आहे; तर स्थानिक पोलीस प्रशासन या हातभट्ट्यांवर कारवाईचा फार्स करीत आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा या हातभट्ट्या सुरू होत असल्याने त्यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.नाणे मावळातील साई-नाणोली, उंबरवाडी, पाथरगाव, पिंपळोली यांच्यासह लोणावळा ग्रामीण व कामशेत पोलीस ठाणे यांच्या समांतर हद्दीत व इतरत्र मोठ्या प्रमाणात अवैध गावठी दारू बनवणे व विक्री जोरात सुरू आहे. तसेच ही गावठी दारू इंद्रायणी नदीकडेला वर्दळ नसलेल्या सुनसान भागात बनवली जाते व ठरावीक ठिकाणी त्याची विक्री होते.कामशेत पोलिसांनी मागील महिन्यात मंगळवार (दि. २७) सायंकाळी पाचच्या सुमारास पाथरगाव-ताजे गावाच्या मध्यावर जुन्या पुणे-मुंबई महामार्ग व रेल्वे ट्रकच्या जवळ असलेल्या एका गावठी हातभट्टीवर धडक कारवाई केली. हातभट्टीची विल्हेवाट लावली होती. या वेळी इंद्रायणी नदीच्या झाडीत मुकेश नानावत हा दररोज शेकडो लिटर दारुची निर्मिती करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत नानावत पोलिसांच्या हाती लागला नाही. ग्रामीण भागातील पोलीस पाटील हे पद नावापुरते राहिले असून, नवनिर्वाचित पोलीस पाटलांना आपल्या कर्त्यव्याची वा अधिकाराची क्षुल्लकसुद्धा माहिती नाही.ताजे येथील एका दारू विक्री करणाºयाने पोलिसांना दर महिना पंधरा हजार रुपये हप्ता असल्याची धक्कादायक माहिती व्हायरल केली होती. शिवाय मागील वेळी आमच्यावर कारवाई केली ती फक्त पैसे वाढवण्यासाठी होती. हे पण सांगितल्याने सामान्य नागरिकांचा पोलिसांवरचा विश्वास उडू लागला आहे. ग्रामीण भागातील या अवैध दारूभट्ट्यांमुळे स्थानिकांना विशेष करून महिलांना मोठा त्रास होत आहे. तसेच या परिसरातून महिला व मुलींना येता-जाता काही विपरीत घटना घडल्यास कोणाला जबाबदार धरावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक पोलीस पाटील व ग्रामपंचायत मात्र मूग गिळून गप्प आहे.तक्रारी आल्यास कारवाई करणारबेकायदा दारूविक्री व गावठी दारूभट्ट्यांवर आमच्या विभागाची कारवाई सुरू असून, आमच्या विभागात फक्त सहा ते सात जण असून, दोन तालुके असल्याने कारवाईस विलंब होतो आहे. मनुष्यबळ कमी असल्याने सर्व ठिकाणी पोहचता येत नाही. नागरिकांच्या तक्रारी आल्यास तातडीने कारवाई करणार आहे. - राजाराम खोत, पोलीस निरीक्षक, राज्य उत्पादनशुल्क विभागअशा प्रकारे अवैध दारूविक्री व बनवणे ही माहिती आम्हाला कळल्यानंतर आम्ही कडक कारवाई करीत आहे. तसेच असे अवैध धंदे सुरू असतील, तर त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्यात येईल.- ज्ञानेश्वर शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड