शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

फेसबुकवारीतून नेत्रदानाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 02:21 IST

यंदाची पाच जुलैपासून सुरू होणारी आषाढी वारी आधुनिकतेची जोड देत असतानाच जास्तीत जास्त लोकोपयोगी कशी होईल, यासाठी गेल्या काही वर्षांपासून विविध संस्थांच्या मार्फत विविध संकल्पना घेऊन वारीत वाटचाल करून समाजाचे प्रबोधन करण्याचे काम केले जात आहे.

देहूगाव - यंदाची पाच जुलैपासून सुरू होणारी आषाढी वारी आधुनिकतेची जोड देत असतानाच जास्तीत जास्त लोकोपयोगी कशी होईल, यासाठी गेल्या काही वर्षांपासून विविध संस्थांच्या मार्फत विविध संकल्पना घेऊन वारीत वाटचाल करून समाजाचे प्रबोधन करण्याचे काम केले जात आहे.यामध्ये प्रामुख्याने वृक्षलागवड व संगोपन, निर्मलवारी, स्वच्छता अभियान यांसारख्या विविध संकल्पना या सोहळ्यादरम्यान लोकांच्यामनावर बिंबवून काळानुरूप बदल स्वीकारले पाहिजेत. याचाच एक भाग म्हणजे यंदाचा 333वा पालखी सोहळा हा फेसबुक दिंडीच्या माध्यमातून घर घर दिंडी पोहचवण्याचे काम सुरू आहे.यासाठी प्रतिवर्षी नवी संकल्पना घेऊन या वारीची वाटचाल केलीजात असते. याद्वारे या वर्षी फेसबुक दिंडीच्या टीमच्या वतीने नेत्रदान फेसबुक दिंडी ही नवी संकल्पना घेऊन सोहळ्यात सहभागी होणार आहे. ही नवी संकल्पना फेसबुक दिंडीटीमच्या वतीने अभिनव उपक्रम ‘नेत्रवारी’ म्हणून पाहावे वया उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन फेसबुक दिंडीचे संचालक स्वप्निल मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. वारीबरोबर नेत्रदानाचाही प्रचार करण्याचा संकल्प युवकांनी केला आहे.यासाठी जागतिक नेत्रदान दिवसाचे औचित्य साधून टीम रंगविशेष प्रस्तुत ‘नेत्रवारी’ हा प्रबोधनात्मक लघुपटही तयार करण्यात आला आहे. देशातील अंध बांधवांकडे फक्त दयेच्या भावनेतून न पाहता त्यांच्यासाठी काही तरी भरीव योगदान देण्याची गरज आहे आणि म्हणूनच फेसबुक दिंडी टीम या वर्षी नेत्रवारी या अभियानातून सर्वांना मरणोत्तर नेत्रदान करण्याचे आवाहन करीत आहे. या उपक्रमातून देशबांधवांनी अंध व्यक्तींना डोळस करण्यासाठी नेत्रदान करावे. जेणेकरून त्यांनादेखील या सृष्टीला पाहण्याचा आनंद घेता येईल.

टॅग्स :Organ donationअवयव दानpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड