शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

भोसरीत गॅस गळतीमुळे स्फोट; एकाच कुटुंबातील तिघांसह चारजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 16:44 IST

सिलिंडरमधील गॅस गळतीमुळे स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत शिक्षिकेसह तिचा पती गंभीर जखमी

ठळक मुद्देगॅस गळतीमुळे स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत शिक्षिकेसह तिचा पती गंभीर जखमी

पिंपरी:  सिलिंडरमधील गॅस गळतीमुळे स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत शिक्षिकेसह तिचा पती गंभीर जखमी झाले. त्यांच्या तेरा वर्षाच्या मुलासह शेजारच्या घरातील सहा वर्षाचा मुलगा किरकोळ जखमी झाले. या भीषण स्फोटाने शेजारील तीन घरांची दारे, खिडक्यांसह घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले. ही घटना बुधवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास भोसरी येथे घडली.भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा साळुंखे (वय ३५), त्याचे पती ज्ञानेश्वर साळुंखे (वय ४०), सिद्धेश साळुंखे (वय १३) शेजारी राहणारा श्रवण विनायक शिर्वेष्ठ (वय ६, सर्व रा. गुरूकृपा कॉलनी, दिघी रोड, सिद्धेश्वर शाळेजवळ, भोसरी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. गुरूकृपा कॉलनीत मंगेश भिरूड यांची दोन मजली इमारत आहे.  पहिल्या मजल्यावर एका खोलीत गेल्या १५ वर्षांपासून साळुंखे कुटूंब भाड्याने राहतात. मनीषा या दिघी रस्ता येथील श्रमजीवी विद्यालयात शिक्षिका आहेत. तर, ज्ञानेश्वर हे चाकण येथील एका कंपनीत नोकरी करतात. साळुंखे यांच्याकडे दोन सिलींडर आहेत. त्यापैकी एका सिलिंडरमधील गॅस संपल्याने साळुंखे यांनी मंगळवारी रात्रीच गॅस भरलेला सिलींडर शेगडीला जोडला. रात्री सिलींडरमधून गॅसगळती झाली. बुधवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास झोपेतून उठल्यानंतर मनीषा यांनी गॅस सुरू करण्यासाठी लाईटरचा वापर केला. लाईटरने गॅस पेटवत असताना भडका होऊन स्फोट झाला. यामध्ये मनीषा, पती ज्ञानेश्वर गंभीररीत्या भाजले. तर, मुलगा सिद्धेश किरकोळ जखमी झाला. स्फोटाचा आवाज आणि प्रचंड हादऱ्याने आजुबाजूच्या नागरिकांमध्ये घबराट उडाली. सर्वजण घराबाहेर पळत सुटले. त्यानंतर साळुंखे यांच्या घरात गॅसगळतीमुळे स्फोट झाल्याची बाब उघड झाली.ऱ्या स्फोटाच्या हादऱ्याने साळुंखे यांच्यासह त्यांच्या शेजारी राहणाऱ्या विनायक शिर्के यांच्या घराचा दरवाजा, खिडकीच्या काचा फुटल्या. एक काच उडून दिवाणवर झोपलेला विनायक यांचा मुलगा श्रवण यांच्या पोटात लागली. यात तो जखमी झाला. तसेच राजेश भिरूड आणि बालाजी मरडे यांच्या घराचाही दरवाजा, खिडकी, टीव्ही तसेच घरातील इतर साहित्याचे प्रचंड नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच भोसरी अग्निशमन उपकेंद्राचे उपअधिकारी नामदेव शिंगाडे, विकास नाईक, विठ्ठल भुसे, कुंडलिक भुतापल्ले, सुरज गवळी, शांताराम घारे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविले. भोसरी पोलीसांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली.

टॅग्स :bhosariभोसरीCylinderगॅस सिलेंडरBlastस्फोट