शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

एक्साईजवाल्यांची सटकली, आता गांजावाल्यांची बारी

By नारायण बडगुजर | Updated: September 13, 2023 19:33 IST

काळेवाडीत दोन लाख १८ हजारांचा २२ किलो गांजा जप्त

पिंपरी: राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साइज) आता गांजा विक्री व साठा करणाऱ्यांकडे मोर्चा वळविला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात काळेवाडी येथे सोमवारी (दि. ११) रात्री कारवाई करून दोन लाख १८ हजार २१० रुपयांचा २१ किलो ८२१ ग्रॅम गांजा जप्त केला. 

राज्य उत्पादन शुल्कचे पुणे जिल्ह्याचे अधीक्षक चरणजितसिंग राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी येथे बीआरटी मार्गालगत विनावापर असलेल्या खोलीमध्ये गांजा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एक्साइजच्या पथकाने सोमवारी (दि. ११) कारवाई केली. यात हिरव्या रंगाची अर्धवट वाळलेले गांजाची पान व फुले  व बोंडे असलेला एकूण २१ किलो ८२१ ग्रॅम वजनाचा दोन लाख १८ हजार २१० रुपये किमतीचा गांजा जप्त केला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात एनडीपीएस कायदा १९८५ चे कलम २०(ब) अन्वये गुन्हा दाखल केला.

एक्साइजचे अधीक्षक चरणजितसिंग राजपूत, पिंपरी-चिंचवडचे उपअधीक्षक युवराज शिंदे, निरीक्षक सुनील परळे, दीपक सुपे, विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक नारायण मुंजाळ, प्रकाश सेतसंदी, अजित बडदे, आशिष जाधव, प्रवीण देशमुख, भरारी पथकाचे बाबुराव घुगे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक स्वप्नील दरेकर, जवान एम. कदम, नारायण जाधव, महेंद्र कदम, अतुल बारंगुळे, रोहिदास गायकवाड, अशोक आदमनकर, जयराम काचरा, शरद हांडगर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.  

गांजावाले गडबडले...

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यात हातभट्टी दारू तसेच अवैध दारू विक्री विरोधात मोठी कारवाई सुरू आहे. त्यामुळे या अवैध धंद्यावाल्यांनी एक्साइजचा धसका घेतला आहे. दरम्यान, एक्साइजच्या पथकाने काळेवाडी येथे अचानक कारवाई करून गांजा जप्त केला. या कारवाईची मोठी चर्चा झाली. जिल्ह्यातील गांजा साठा करणारे, विक्री करणारे तसेच या धंद्यात असलेल्यांना या कारवाईतून इशारा देण्यात आला असून गांजावाले गडबडले आहेत.  

एक्साईजकडून यापुढे गांजा विरुद्ध नियमित कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे गांजाबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी एक्साइजच्या १८००२३३९९९९ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा. त्यानुसार कारवाई करण्यात येईल.

- चरणजितसिंग राजपूत, अधीक्षक, एक्साइज, पुणे

टॅग्स :Puneपुणे