शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

उक्ती आणि कृती वेगळी नको- प्रकाश आमटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 02:44 IST

आकुर्डी येथे झाला सपत्निक सन्मान

पिंपरी : उक्ती आणि कृती वेगळी नको. मंचावर लोकांसमोर एक बोलायचे आणि आयुष्यात मात्र वेगळेच वागायचे हे चुकीचे आहे. सेवा करायची असेल तर ती नि:स्वार्थ भावनेने करायला हवी. आम्ही ज्या भागामध्ये कार्य केले त्या आदिवासी लोकांकडून समाजातील व्यवहार्यता शिकण्यासारखी आहे.आनंदवनातील कार्य हे इतके आनंद देणारे आहे की येथे भेट देणारे अनेक वेळेस म्हणतात की आनंदवनातील आनंद हा येथील कुष्ठरोगापेक्षा जास्त संसर्गजन्य आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश आमटे यांनी केले. आकुर्डी येथील डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुलाच्या वतीने डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांचा सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या वेळी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणचे अध्यक्ष सदाशिव खाडे, डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुलाचे उपाध्यक्षसतेज पाटील, संचालक डॉ. एस.के.जोशी आदी उपस्थित होते. या वेळी आमटे दाम्पत्याचा सामाजिक कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. शलाका पारकर यांनी सूत्रसंचालन केले.डॉ. आमटे म्हणाले, ‘‘आदिवासी भागातील लोकांची व्यवहार्यता अंगीकारण्यासारखी आहे. तेथे समाजकार्याला सुरूवात केल्यापासून आजपर्यंत त्या भागात बलात्काराची घटना ऐकायला भेटली नाही. कुठलाही वाद स्थानिकांमध्ये झाला तर पंचायतीच्या एका बैठकीमध्ये निर्णय घेऊन योग्य निवाडा केला जातो. ही व्यवहार्यता त्यांनी टिकून ठेवली आहे.’’ विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ‘‘ शहरात सगळ््या सोयी-सुविधा होत्या. मात्र त्यांचा मोह कधी झाला नाही. बाबांसोबत लहानपणापासून त्यांचे कार्य पाहत होतो. त्यामुळे ते कार्य पुढे नेण्याची मनाची तयारी झाली होती. त्यामुळे ऐश्वर्याची लालसा कधीच झाली नाही.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड