शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पालक मागताहेत बालकाकरवी भीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 01:35 IST

खडकीतील घटना : प्रतिबंधक कायद्यानुसार पोलिसांची कारवाई

खडकी : बालकाला कडेवर घेऊन लोकांची सहानुभूती मिळवत, एक अठरा ते वीस वर्षांची तरुणी शहराच्या विविध भागांत भीक मागताना दिसून येत होती. त्यांचे कोरेगाव पार्क येथे टिपलेले छायाचित्र व्हॉट्सअ‍ॅपवर व्हयरल झाले होते. भीक मागण्यासाठी बालक चोरले असावे, असा संशय व्हॉट्स अ‍ॅपवर व्यक्त करण्यात आला होता. खडकी परिसरात बालकाला कडेवर घेऊन फिरणाऱ्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केली असता, पालकांनीच बालक मुलीकडे भीक मागण्याच्या उद्देशाने सोपविले असल्याची

बाब निदर्शनास आली. बालकाच्या आई-वडिलांसह, नातेवाईक असलेल्या मुलीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल झालेल्या छायाचित्रातील गोंडस बालकाला कडेवर घेऊन भीक मागणारी मुलगी खडकी बाजार परिसरात असल्याची माहिती खडकी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे यांना मिळाली. त्यांनी पोलीस हवालदार दुबळे व महिला स्टाफसह खडकी बाजारात जाऊन खात्री केली. बालकासह तरुणीला खडकी पोलीस ठाण्यात आणले. तिच्याकडे विश्वासात घेऊन चौकशी केली असता बालक मामेभावाचे असल्याचे तिने सांगितले. तिच्या मामेभावाला खडकी ठाण्यात बोलावून घेतले. मामेभावाने आमच्या संमतीने भीक मागण्यासाठी बाळ तिच्या ताब्यात दिल्याची धक्कादायक बाब त्यांनी कबूल केली. बालकाचे वडील विजय सार्जन पवार, आई शालन पवार आणि १९ वर्षांची तरुणी मेघा निमन भोसले या तिघांना भिक्षा प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झालेल्या छायाचित्रातील गोंडस बालकाला कडेवर घेऊन भीक मागणारी मुलगी खडकी बाजारात असल्याची माहिती खडकी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे यांना मिळाली. पोलीस हवालदार दुबळे यांनी बाजारात जाऊन खात्री केली. बालकासह तरुणीला खडकी पोलीस ठाण्यात आणले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड