शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांचे आॅडिट, राष्ट्रवादी काँग्रेस ते भाजपाच्या विकासकामांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 01:09 IST

पिंपरी : विकासकामांचा दर्जा उत्तम राहण्यासाठी त्यांचे त्रयस्थ तांत्रिक लेखा तपासणी (थर्ड पार्टी टेक्निकल आॅडिट) करणे राज्य सरकारने आठ वर्षांपूर्वी बंधनकारक केले आहे.

पिंपरी : विकासकामांचा दर्जा उत्तम राहण्यासाठी त्यांचे त्रयस्थ तांत्रिक लेखा तपासणी (थर्ड पार्टी टेक्निकल आॅडिट) करणे राज्य सरकारने आठ वर्षांपूर्वी बंधनकारक केले आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि सरकारने आदेश दिलेल्या मुदतीपासून ते आताच्या स्थायी समितीने मंजुरी दिलेल्या सर्व विकासकामांचे थर्ड पार्टी टेक्निकल आॅडिट करावे, अशा सूचना स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना मंगळवारी केल्या आहेत.राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत केल्या जाणाºया विकासकामांचा दर्जा उत्तम असावा, यासाठी राज्य सरकारने कामांचे थर्ड पाटी टेक्निकल आॅडिट (त्रयस्थ तांत्रिक लेखा तपासणी) करण्याबाबत २ मार्च २००९ ला आदेश दिला होता. तो पिंपरी-चिंचवड महापालिकेलाही बंधनकारक आहे. करदाते नागरिक घाम गाळून कमविलेला पैसा महापालिकेला विविध कर रूपाने देतात. या पैशातून केली जाणारी विकासकामे उत्तम दर्जाची असणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्य सरकारने दिलेल्या आदेशाची पिंपरी-चिंचवड महापालिकेने अंमलबजावणी करावी, अशी मागणी तत्कालीन नगरसेविका सीमा सावळे यांनी २०१० मध्ये त्या वेळचे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रशासनाकडे केली होती.त्यासाठी त्यांनी महापालिकेने केलेल्या अनेक विकासकामांबाबत कोणकोणत्या तक्रारी येतात आणि झालेल्या विकासकामांवर पुन्हा-पुन्हा कसा खर्च केला जातो, याची माहिती प्रशासनाला दिली होती.>थर्ड पार्टी आॅडिटच्या प्रशासनास सूचनाजुन्या पुणे-मुंबई महामार्गावर उभारलेल्या ग्रेड सेपरेटरची वारंवार दुरुस्ती होणे, वायसीएमसह विविध रुग्णालयांसाठी लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेली विविध उपकरणे वारंवार नादुरुस्त होणे, केंद्र सरकारच्या जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत राबविलेल्या सर्वच प्रकल्पांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सावळे यांनी निदर्शनास आणून दिले होते. थर्ड पार्टी टेक्निकल आॅडिटची मागणी केली होती. महापालिकेतील सत्तांतरानंतर स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी राज्य सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी सुरु केली आहे.सावळे म्हणाल्या,‘‘राज्य सरकारने आदेश दिलेल्या तारखेपासून म्हणजे २ मार्च २००९ पासून झालेल्या सर्व विकासकामांचे तसेच आजपर्यंत मंजुरी दिल्यानंतर होणाºया सर्व विकासकामांचे थर्ड पार्टी टेक्निकल आॅडिट करण्याचे आदेश आयुक्तांना दिले आहेत. आयुक्तांनीही थर्ड पार्टी टेक्निकल आॅडिटसाठी प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण कामे होणार आहेत.’’