शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चिंचवड रेल्वे स्थानकावर ‘एस्केलेटर’; तिकिटासाठी स्वतंत्र खिडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 05:55 IST

चिंचवड येथील स्थानकावर सरकता जीना (एस्केलेटर) बसविण्यास मंजुरी दिली असून, आकुर्डी येथे देशभरातील रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण करण्यासाठी अतिरिक्त स्वतंत्र तिकीट खिडकी सुरू होणार आहे. पुणे-लोणावळा चौपदरी रेल्वेमार्गाच्या कामाला गती दिली आहे.

पिंपरी : चिंचवड येथील स्थानकावर सरकता जीना (एस्केलेटर) बसविण्यास मंजुरी दिली असून, आकुर्डी येथे देशभरातील रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण करण्यासाठी अतिरिक्त स्वतंत्र तिकीट खिडकी सुरू होणार आहे. पुणे-लोणावळा चौपदरी रेल्वेमार्गाच्या कामाला गती दिली आहे.पुणे-लोणावळा लोकलसाठी स्वतंत्र मार्ग तयार झाल्यानंतर नवीन लोकल गाड्या वाढ करण्यात येईल, असे मध्य रेल्वेचे छत्रपती शिवाजी टर्मिनल, मुंबई कार्यालयातील सहायक सचिव सु. मु. केळकर यांनी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलमअली भालदार यांना पत्राद्वारे कळविले आहे.चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने १२ जानेवारी २०१८ ला केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, रेल्वे बोर्ड अध्यक्ष अश्विनी लोहाणी, पुणे येथील विभागीय व्यवस्थापक (मध्य रेल्वे) यांना विविध स्थानकांसंबंधीच्या समस्या, तक्रारींची सविस्तर माहिती पत्राद्वारे देण्यात आली होती.प्रवासी संघाच्या वतीने केलेल्या लेखी तक्रारी, सूचनांच्या पडताळणीबाबत रेल्वेमंत्र्यांनी केलेल्या सूचनेनुसार अधिकाऱ्यांनी माहिती घेतली. प्रवासी संघाच्या विविध मागण्यांची दखल घेतली.दापोडी रेल्वे स्थानकावरील, तसेच इतर रेल्वे स्थानकांच्या छतावरील फुटलेले पत्रे, पावसाळ्यात गळणारे छत दुरुस्तीचे प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठविले आहेत. कासारवाडी, देहूरोड रेल्वे स्थानकावर प्रवासी महिलांच्या सुरक्षेसाठी रात्री पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, यासंबंधी आदेश देण्यात आले आहेत. सर्व स्थानकांवरील महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्यात यावेत असेही कळवलेले आहे. कमी व लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांच्या तिकीट आरक्षणासाठी तीन खिडक्या सध्या सुरू आहेत.- पिंपरी व आकुर्डी येथेही तिकीट आरक्षण खिडकी सुरू व्हावी, अशी मागणी प्रवासी संघाच्या वतीने केली होती. त्यात आकुर्डी येथे पश्चिमेच्या बाजूला तिकीट घर, आरक्षण तिकीट खिडकी मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे रावेत, आकुर्डी, वाल्हेकरवाडी, प्राधिकरण, निगडी, तळवडे भागातील प्रवाशांना आरक्षणासाठी चिंचवडला येण्याची गरज भासणार नाही. त्यांचा वेळ, पैसा, शारीरिक श्रम वाचणार आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड