शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदाराला मिळाली अखेर दिशा, स्थलदर्शक फलक बसविण्यास सुरवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 01:30 IST

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग : स्थलदर्शक फलक बसविण्यास केली सुरवात

देहूरोड : मुंबई -पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते देहूरोड दरम्यानच्या दुपदरी रस्त्याचे चौपदरीकरण काम पूर्ण होत आहे. रस्ते विकास महामंडळाच्या रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराकडून महामार्गावर निगडी ते देहूरोड भागात रस्त्यालगत लावण्यात आलेले स्थलदर्शक फलक चुकीचे, अर्धवट असल्याने वाहनचालक व नागरिकांची दिशाभूल होत होती.

याबाबत लोकमतने छायाचित्रांसह सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून संबंधितांच्या निदर्शनास आणले होते. त्याची दखल घेत संबंधितांनी तातडीने सर्वचुकीचे व अर्धवट दिशादर्शक फलक काढून टाकले होते. मात्र त्यानंतर एक महिना उलटूनही संबंधित ठिकाणी फलक लावण्यात आलेले नसल्याने लोकमतने पुन्हा सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा केल्याने याची दखल घेत संबंधितांनी दिशादर्शक फलक बसविण्यास सुरुवात केली आहे.‘लोकमत’मध्ये महामार्गावरील दिशादर्शक फलक दिशाहीन झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर (दि. ३१ जुलै) संबंधितांनी सर्व चुकीचे फलक काढले होते. त्या वेळी नवीन फलक लवकरच बसविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, एक महिना उलटला तरी फलक बसविण्यात आलेले नसल्याने निगडी ते देहूरोड रस्त्याच्या दुतर्फा इतर राष्ट्रीय महामार्गांवर लावण्यात आलेल्या स्थलदर्शक फलकांप्रमाणे फलक बसविणे गरजेचे होते.मात्र याबाबत विलंब होत चालल्याने वाहनचालक व भाविकांची गैरसोय टाळण्याबाबत देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, तसेच फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाच्या वतीने अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनीही रस्ते विकास महामंडळास निवेदन देऊन स्थलदर्शक फलक बसविण्याची मागणी केली होती.लोकमतने ‘स्थलदर्शक फलक नसल्याने वाहनचालक होताहेत दिशाहीन; चुकीची दुरुस्ती कधी होणार?’ या शीर्षकाचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध (दि. ४ सप्टेंबर) केले होते. त्या वृत्ताची दखल घेत महामंडळाच्या संबंधित ठेकेदाराने चुकीच्या फलकांची दुरुस्ती करून नवीन फलक बनवून नुकतीच बसविण्यास सुरुवात केली असून, पहिल्या टप्प्यात श्रीक्षेत्र देहूगाव, देहूरोड येथील बुद्धविहार, देहूरोड बाजार, गार्डन सिटी, फिल्ड अ‍ॅम्युनिशियन डेपो आदी फलक बसविले असून लवकरच सर्व स्थलदर्शक फलक बसविण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhighwayमहामार्ग