शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

डांगे चौकाला अतिक्रमणाचा विळखा, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:01 IST

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : व्यावसायिकांनी पदपथही बळकावले; कारवाईची मागणी; पादचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. बेशिस्त वाहनचालक, बेशिस्त पार्किंग, व्यावसायिकांचे अतिक्रमणे, पदपथावरील अतिक्रमणे त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. डांगे चौक शहरातील महत्त्वपूर्ण चौक आहे, असे असतानाही या चौकातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना होताना दिसून येत नाहीत. परिणामी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

डांगे चौकातून हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाºया वाहनांची संख्या लक्षणीय आहे. डांगे चौकाला चारही बाजूने अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. आठवडे बाजाराच्या दिवशी येथील परिस्थिती अतिशय गंभीर असते. वाहनाच्या रांगा लागलेल्या असतात. पदपथांचा पादचाºयांना वापर करता येत नाही. चौकात काही ठिकाणी पदपथच गायब झालेले आहेत. सध्या जे पदपथ आहेत, त्यावरून नागरिक ये-जा करू शकत नाहीत. व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात पदपथावर अतिक्रमण केले आहे. बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौकादरम्यान व्यावसायिकांनी पदपथ स्वत:च्या व्यवसायासाठी हस्तगत करून घेतला आहे. डांगे चौक ते रोजवूड हॉटेलपर्यंत व्यावसायिकांनी पदपथावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचाºयांना पदपथाचा वापरच करता येत नाही. त्याचप्रमाणे काही व्यावसायिकांनी पदपथावरच पानटपरी, हातगाडे, हॉटेल पार्किंग हे सर्व पदपथावरच केले जाते. दत्तनगर ते डांगे चौकदरम्यान पदपथावर पान टपरी, पंक्चर दुकाने, हातगाडीधारक यांनी पदपथावरच आपली दुकाने थाटली आहेत. ताथवडेकडून डांगे चौकात येणाºया रस्त्यावर पदपथावर फळविक्रेत ठाण मांडून असतात. त्यामुळे पदपथाचा वापर करता येत नाही. गणेशनगरकडून डांगे चौकात येणाºया रस्त्यावरच विविध वस्तू विक्रेते ठाण मांडून असतात. डांगे चौकातून गणेशनगरला जाणाºया रस्त्यावर भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण आहे. भाजी खरेदीसाठी येणारे काही बेशिस्त वाहनचालक बेशिस्तपणे पार्किंग करतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो. व्यावसायिकांनी पदपथच गायब केले आहेत. पदपथावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळेनागरिकांना चालताना रस्त्याचाच वापर करावा लागतो. वाहतूककोंडी असल्यामुळे मार्ग काढत काढत जावे लागते. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.

पदपथावर बेशिस्त पार्किंगहॉटेल, रुग्णालय, दुकानांसमोर पदपथावरच दुचाकी पार्किंग करण्यात येते. त्याठिकाणी पदपथाची मोडतोड करून पदपथावर दुचाकी पार्किंग तयार करण्यात येते. पदपथावर बेशिस्त आणि अनधिकृत पार्किंग करण्यात येते. वाहने पार्किंग केल्यामुळे पादचाºयांना पदपथाचा वापर करता येत नाही.डांगे चौकात वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे कामावर जाण्यासाठी वेळ होतो. येथील वाहतूक कोंडी रोजचीच झाली आहे. याठिकाणी टेम्पो, रिक्षा हे रस्त्यावरच पार्क केले जातात. त्यामुळे बºयाच वेळा वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या वाहतूककोंडीत वेळ खूप जातो. डांगे चौकात पीएमपी बस बंद पडली तर मग खूप जास्तच वेळ जातो. - शिल्पा देशपांडे, आयटीयन्सबिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौकादरम्यानचे पदपथ अतिक्रमणामुळे गायब झाले आहेत. या मार्गावर काही इलेक्ट्रिकल वस्तुची दुकाने आहेत. या दुकानातील विक्रीचे साहित्य पदपथावर ठेवण्यात येते. त्यामुळे पादचाºयांना पदपथाचा वापर करता येत नाही. - रूपेश सोनुने, तरुणडांगे चौकात पदपथावरच पथारीवाले, हातगाडीवाले यांच्यासह अन्य विक्रेते ठाण मांडतात. त्याप्रमाणे गणेशनगरकडून डांगे चौकात जाणाºया रस्त्यावर भाजी विक्रेते रस्त्यावरच भाजी विक्री करतात. त्यामुळे वाहतूककोंडी होते.- माया पवळे, स्थानिकडांगे चौकातील अतिक्रमणाचा प्रश्न जटिल बनला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे डांगे चौकात पूर्वीपासूनच अतिक्रमण केले जाते. मात्र याकडे महापालिका प्रशासन लक्ष देत नाही. किंवा कधीतरी त्यांनी कारवाई केली तर दुसºया दिवशी परत आहे तशीच परिस्थिती दिसते. डांगे चौकात अनेक ठिकाणी पदपथच गायब झालेले आहेत. रस्त्याच्या कडेचे पदपथच गायब होतात. तरीदेखील महापालिका प्रशासन याकडे लक्ष देत नाही. आज डांगे चौकातील परिस्थिती अशी आहे, की पदपथावरून कोणीही चालूच शकत नाही. - पंकज बिराजदार, ज्येष्ठ नागरिक

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड