शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

मुहूर्त गाठताना पुढाऱ्यांची दमछाक

By admin | Updated: May 5, 2017 02:49 IST

मावळ तालुक्यात सध्या लग्नाचा हंगाम शिगेला पोचला असून, एकेका दिवशी आठ-दहा विवाह सोहळ्यांची निमंत्रणे मिळतात

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यात सध्या लग्नाचा हंगाम शिगेला पोचला असून, एकेका दिवशी आठ-दहा विवाह सोहळ्यांची निमंत्रणे मिळतात. मुहूर्त एकच वेळ असल्याने लग्नाला उपस्थित राहण्यासाठी पुढारी व लोकप्रतिनिधी यांची कमालीची धावपळ होत असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. यंदा चैत्र आणि वैशाख महिन्यात विवाहाचे चांगले मुहूर्त असल्याने मंगल कार्यालय मालकांसह बॅण्ड पथक व ढोल, लेझीम पथकास सुगीचे दिवस आले आहेत. तालुक्यात अनेक बहुतांशी ठिकाणी डीजे वाद्यकामास बंदी असल्याने डीजेच्या कर्णकर्कश आवाजापासून तालुक्यातील जनतेची मात्र बऱ्यापैकी सुटका झाली आहे. सध्या विवाह सोहळ्यांचा धुमधडाका सुरू झाला आहे. एकेका दिवशी नात्यागोत्यातील व मित्र परिवारातील आठ-दहा विवाह सोहळ्यांची निमंत्रणे येऊ लागल्याने ग्रामस्थांची धावपळ होत आहे. त्यातही राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांची तर अधिकच दमछाक होताना दिसत आहे. कोणाचाही विवाह असला, तरी गावातील राजकीय पक्षांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांची नावे निमंत्रण पत्रिकेत छापण्याची प्रथा रूढ झाली आहे. मग त्यांचा त्या कुटुंबाशी संबंध असो वा नसो! भावकीच्या बरोबरीने त्यांना स्थान दिले जात आहे. जाणकार घराण्यांनी मात्र या नावांना तिलांजली दिल्याचे पहावयास मिळते. (वार्ताहर)पत्रिकेवर वाढले निमंत्रक कार्यकर्त्यांकडे कोणतेही पद नसले तरी ‘सामाजिक कार्यकर्ता’ असा उल्लेख करूनही त्यांची नावे निमंत्रण पत्रिकेत छापली जातात. त्यामुळे पत्रिका मोठ्या आकारात छापल्या जात आहेत. पत्रिकेत नाव व लग्नाला उपस्थित राहण्याची गळ यजमानांकडून घालण्यात येत असल्याने पुढाऱ्यांना या साहेळ्याला उपस्थित राहावे लागत आहे. एकाच मुहूर्तावर आठ-दहा विवाहएकाच दिवशी आठ-दहा विवाह व विवाहाची वेळ ही थोड्याफार फरकाने तीच असल्याने ती साधताना पुढारी व लोकप्रतिनिधी यांची दमछाक होत आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे विवाह सोहळ्यातील सत्कार आता बऱ्यापैकी बंद झाले आहेत. आता फक्त शाब्दिक सत्कार केले जातात. सत्कारमूर्ती जावयांची संख्या मात्र वाढलेली आहे. जावयही स्वाभिमानी असल्याने नवरा -नवरी विवाहमंचावर आल्याशिवाय ते सन्मान घेण्यास जातच नाहीत. जावई सन्मान घेण्यास आता चुलत-मावस जावयांचाही सत्कार केला जात आहे.