शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांनी लोकशाही मजबूत करावी

By admin | Updated: January 29, 2017 04:01 IST

ज्येष्ठ नागरिकांनी निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचा धागा अधिक मजबूत करावा, असे आवाहन निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंतराव माने यांनी केले.

पिंपरी : ज्येष्ठ नागरिकांनी निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचा धागा अधिक मजबूत करावा, असे आवाहन निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंतराव माने यांनी केले. पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जनजागृती मोहिमेंतर्गत शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्याचे आयोजन शनिवारी पिंपरीतील येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.या वेळी सहआयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, अनंत खेळकर, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर कोळी, कार्याध्यक्ष सूर्यकांत मुथियान, तसेच विश्वास महाजन, वृषाली मरळ, मारुतराव मोरे, हरिनारायण शेळके, रमेश परब आदी उपस्थित होते. माने म्हणाले, ‘‘आपली लोकशाही सुदृढ व बळकट होण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढविणे गरजेचे आहे. यासाठी ज्येष्ठांनी आपल्या परिवारातील, परिसरातील मतदारांना मतदान करण्याविषयी प्रवृत्त करावे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शहरात विविध उपक्रमाद्वारे व माध्यमाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये रॅली, पथनाट्य, कार्यशाळा, मेळावे आदीचा समावेश असून यामध्ये ज्येष्ठांनी सहभाग घ्यावा. मतदार व मतदान जनजागृती मोठ्या प्रमाणावर करुन यावेळी मतदानाची टक्केवारी ७० टक्क्यापेक्षा जास्त करावी.’’ निवडणूक निर्भयमुक्त, पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही या वेळी त्यांनी केले. ‘माझ्याजवळ बसा अन् खुदकन हसा, जपू लोकशाहीचा वसा’ हा मतदार जनजागृतीपर मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आला. या वेळी सह आयुक्त दिलीप गावडे, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे कार्याध्यक्ष सूर्यकांत मुथियान यांनीही मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक अण्णा बोदडे यांनी केले. तर सूत्रसंचालन रमेश भोसले व किशोर केदारी यांनी केले. (प्रतिनिधी)