शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या अठरा महिन्यांच्या ‘गुगल बॉय’ च्या अफाट बुध्दीमत्तेची धमाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 17:32 IST

पिंपरी परिसरात ‘गुगल बॉय’ म्हणून ओळख असून तो सर्वत्र चर्चेचा विषय...

ठळक मुद्देअवघ्या दीड वर्षाच्या वयात मोठी शब्दसंपदा असणाऱ्या प्रत्यूषची चर्चा भूमितीचे आकार, खेळाचा प्रकार या गोष्टींची माहिती मुखोद्गत नुसत्या ध्वजावरून ओळखतो ४८ देशांची नावे

रमेश फरताडे - पुणे : जन्मानंतर चालणं, बोलणं यासाठी ठराविक काही महिने- वर्ष तरी लागतातच. जगात जसे प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात तसे याबाबतीत म्हणता येईल. एक अठरा महिन्यांचा अवलिया मुलगा ज्याने मागील काही दिवसांपासून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याची पिंपरी परिसरात ‘गुगल बॉय’ म्हणून ओळख असून तो सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. त्याने अठरा महिन्यांच्या कालावधीतच शुभंकरोती, आठवड्यांची नावे, एबीसीडी, महिन्यांची नावे, सर्व रंग, दिशा, श्लोक, दहा ते बारा बडबडगीते आणि त्यावरील कृती अगदी योग्यरित्या ओळखतो. प्रत्यूष बद्रीनारायण पाटील असे या ‘ गुगल बॉय ’ चे नाव आहे.  प्रत्युष हा सोमाटणे येथील रहिवासी आहे. प्रत्यूषचे वडील शिरगाव येथील एका खासगी शाळेत शिक्षक आहेत. तर आई उच्चशिक्षित असून गृहिणी आहेत. प्रत्यूष हा नऊ महिन्यांचा झाल्यापासून त्याच्यात असणाऱ्या या विशेष बुद्धिमत्तेचा अनुभव त्याची आई अश्विनी पाटील यांना आला. त्याने पहिल्याच वेळेस गायत्री मंत्र म्हणून दाखवला. काहीच शब्द बोलू न शकणाऱ्या वयात या मुलाने गायत्री मंत्र म्हणून दाखवला म्हणजे यात काहीतरी वेगळं आहे, हे त्यांनी हेरलं आणि त्याला पुढील गोष्टीसाठी तयार करायचा, असं त्यांनी ठरवलं.  त्याने काही गाण्यांवरून गायकांची नावे, चित्रावरून काही गाड्यांची, झाडांची नावे, जंगली प्राणी, पाळीव प्राणी, राष्ट्रीय प्राणी, फूल, खेळ, राष्ट्रगीत, फोटोवरून सुमारे ५० नातेवाइकांची नावे आणि विशेष म्हणजे नुसत्या ध्वजावरून ४८ देशांची नावे ओळखतो. भूमितीचे आकार, खेळाचा प्रकार या गोष्टींची माहिती मुखोद्गत आहेत.    अवघ्या दीड वर्षाच्या वयात मोठी शब्दसंपदा असणाऱ्या प्रत्यूषची चर्चा होत आहे.  त्याच्या गुणाविषयी त्याची आई अश्विनी पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले, त्याच्यात असणाऱ्या गुणांची ओळख मला नवव्या महिन्यांतच झाली होती. त्यामुळे मी त्याचा हा गुण वाढीस लागावा म्हणून प्रयत्न करायला सुरू केले आणि आज आपण त्याची  प्रगती पाहतो. जर प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलात विशेष गुण दिसला तर तो हेरून त्याला वाढीस लागण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

टॅग्स :Puneपुणे