शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

लोणावळ्यात आठ तास मिरवणूक, दर्शनासाठी महिलांची वेगळी रांग, मंडळांनी दिले डीजेमुक्तला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 01:42 IST

पर्यटननगरी अशी ओळख असलेल्या लोणावळा शहरात पारंपरिक वाद्यांच्या गजरात तब्बल आठ तास गणेश विसर्जन मिरवणुकीचा सोहळा रंगला होता.

लोणावळा : पर्यटननगरी अशी ओळख असलेल्या लोणावळा शहरात पारंपरिक वाद्यांच्या गजरात तब्बल आठ तास गणेश विसर्जन मिरवणुकीचा सोहळा रंगला होता. कायदा व सुव्यवस्थेचे पालन करत डिजेमुक्त मिरवणुकीने शहरात रंगलेला हा सोहळा पाहण्याकरिता पंचक्रोशीतील नागरिक व भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावर्षी प्रथमच हा सोहळा पाहण्याकरिता महिलांना मिरवणुकीच्या डाव्या बाजूला व पुरुषांना उजव्या बाजूला उभे राहण्याची व्यवस्था शहर पोलिसांनी केल्याने महिला छेडछाड, धक्काबुक्की सारख्या प्रकारांना आळा बसला तसेच महिलांना देखील सुरक्षितपणे ही विसर्जन मिरवणूक पाहता आली.दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास रायवुड गणेश मंडळ या मानाच्या पहिल्या बाप्पांची आरती करत चार वाजता वाजतगाजत बाप्पांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. साडेपाच वाजण्याच्या सुमारास मानाचा पहिला गणपती मावळा पुतळा या मुख्य चौकात दाखल झाला. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवत मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. तद्नंतर गावठाणातील मानाचा दुसरा गणपती तरुण मराठा मित्र मंडळ, रोहिदासवाडा येथील मानाचा तिसरा गणपती रोहिदास गणेश मंडळ, गवळीवाड्यातील मानाचा चौथा गणपती गवळीवाडा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, वलवण गावातील शेतकरी भजनी मंडळ हा मानाचा पाचवा गणपती सोबतच इतर मानाचे गणपती चौकात दाखल होण्यास सुरुवात झाली. न्यायालयाच्या आदेशाचे लोणावळ्यात काटेकोर पालन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान शहरात कोठेही डिजे वाजला नाही. पारंपरिक वाद्याच्या गजरात शहरात हा मिरवणूक सोहळा रंगला होता. रात्री साडेआठ वाजता मानाचा पहिला गणपती मुख्य स्वागतकक्ष असलेल्या शिवाजीमहाराज चौकात व दहा वाजता विसर्जन घाटावर दाखल झाला तर अखेरचा मानाचा बावीसावा गणपती मध्यरात्री बारा वाजता मुख्य चौकात दाखल झाला.गणेश मंडळाचे व ढोल-ताशा पथकांचे स्वागत करण्याकरिता लोणावळा नगर परिषद, लोणावळा शहर पोलीस स्टेशन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, मनसे, शिवसेना अवजड वाहतूक सेना, सत्यनारायण कमिटी व मावळ वार्ता फाउंडेशन यांच्या वतीने कक्ष उभारले होते. तर लायन्स क्लब लोणावळा खंडाळा यांनी चहावाटप, रामदेवबाबा भक्त मंडळाकडून भेळ वाटप, शिवसेना लोणावळा शहरच्या वतीने मसाले भात व मावळ वार्ता फाउंडेशनच्या वतीने चहा, वडापाववाटप करण्यात आले.पुढच्या वर्षी लवकर या असा गजर करत भाविकांनी मोठ्या भक्तिभावात बाप्पाला निरोप दिला.नगर परिषद : विसर्जन घाटावर सुविधाविसर्जन घाटावर लोणावळा नगर परिषदेच्या वतीने चोख व्यवस्था करत विसर्जनाकरिता कर्मचारी नियुक्त केले होते. मावळचे प्रांत अधिकारी सुभाष भागडे, मुख्याधिकारी सचिन पवार, मंडल अधिकारी बजरंग मेकाले यांच्यासह पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी जातीने हजर होते. पोलीस प्रशासनाच्या वतीने विसर्जन मिरवणूक मार्गावर मोठा बंदोबस्त ठेवला होता. भक्तिमय वातावरणात व शांततेमध्ये लोणावळा शहरात हा विसर्जन मिरवणुकीचा सोहळा पार पडला. एक वाजण्याच्या सुमारास अखेरच्या बाप्पांना गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... अशी साश्रू नयनांनी हाक देत भाविकांनी भावपूर्ण निरोप दिला.गणपती बाप्पा मोरयाऽऽचा गजर१कामशेत : कामशेत शहरातील विविध भागांत सार्वजनिक व घरगुती बाप्पांचे दहाव्या दिवशी विसर्जन करण्यात आले. या वेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्याघोषणांच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. शहरातील बहुतेक मंडळांचे बाप्पा गौरी विसर्जनाच्या दिवशीच विसर्जित करण्यात आले होते. मात्र काही मंडळांचे व घरगुती गणपतींचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी धाटामाटात, गुलाल विरहित, पारंपरिक मिरवणुकीत विसर्जन करण्यात आले. या वेळी नाणे रोडवरील इंद्रायणी नदी काठावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.२शहरातील प्रमुख रस्त्यांवर दुपारपासून लोकांची व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची लगबग सुरू झाली. घरगुती व मंडळांच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या होत्या.मानाचा गणपती ओम समर्थ मित्र मंडळ यांनी पर्यावरणपूरक रथाची आकर्षक सजावट वपारंपरिक वाद्य, विद्युत रोषणाई सह मिरवणूक काढली. या वेळी इतर मंडळांचे श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.३ नवयुग मित्र मंडळाने ‘गडकिल्ले वाचवा महाराष्ट्र वाचवा’ असा संदेश विसर्जन मिरवणुकीत दिला. तर गणेश सहकार मित्र मंडळ बाजारपेठ यांनी आकर्षक सजावट केली होती. याच प्रमाणे शहरातील इतर भैरवनाथ मित्र मंडळ, शिवप्रेरणा मित्र मंडळ, श्री शूर समर्थ मित्र मंडळ, भोलेनाथ मित्र मंडळ, श्रीपाद मित्र मंडळ व इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विविध प्रकारची सजावट करून विसर्जन मिरवणुकीची रंगत वाढवली होती. याचबरोबर ढोल, लेझीम या पारंपरिक वाद्यांच्या तालावर, बाप्पांच्या नामाचा जयघोष करत तरुण लहान थोर सर्व जण नामघोषात बुडाले होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत महिलांचा मोठा सहभाग होता. दहा दिवसांसाठी आलेल्या या पाहुण्याला निरोप देताना सर्वांना गहिवरून आले होते.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनnewsबातम्या