शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जाचक अटीमध्ये अडकली शैक्षणिक सहल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:20 IST

शैक्षणिक सहलीसाठी जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सहलींचे नियोजन जाचक अटींमध्येच अडकल्याचे दिसून येत आहे.

- मंगेश पांडे पिंपरी : शैक्षणिक सहलीसाठी जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सहलींचे नियोजन जाचक अटींमध्येच अडकल्याचे दिसून येत आहे.प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या सहली आयोजित करताना सहलीच्या परवानगीसाठी शिक्षण उपसंचालक यांना प्रस्ताव पाठविले जातात. मात्र, हे प्रस्ताव पाठविले जात असताना शाळा, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणेही आवश्यक आहे. याबाबत पुणे विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी नियमावली आखून दिली असून, याबाबतचे परिपत्रकही प्रसिद्ध केले आहे. या परिपत्रकात सहलीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी नमूद आहे. यंदाच्या वर्षापासून सहलीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विम्याबाबतचे पत्र, तसेच सहलीसाठी विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याबाबतही सांगितले आहे. मात्र, विद्यार्थ्यांचा विमा उतरविण्यासह वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विमा शाळा उतरविणार की पालक हा संभ्रम आहे.प्राचार्यांचे शिफारस पत्र, हमीपत्र, सही-शिक्क्यासह विद्यार्थ्यांची यादी, ठिकाणाबाबतची माहिती, संस्था व्यवस्थापनाचे परवानगी पत्र, बसबाबत माहिती, विद्यार्थ्यांच्या यादीसह आरटीओ पासिंग परवाना, विद्यार्थ्यांच्या विम्याच्या प्रती, पालक व विद्यार्थ्यांचे संमतीपत्र, विद्यार्थ्यांच्या रक्तगटाबाबतची माहिती, विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे बैठकीचे प्रमाणपत्र.>शिक्षक, पालक यांचे प्रबोधन गरजेचेविद्यार्थ्यांच्या वैयक्तिक, विकासात्मक, तसेच ज्ञानात भर पडेल अशा शैक्षणिक, अभ्यासात्मक, संशोधनात्मक स्थळी सहलीचे आयोजन करावे. सहल नेण्यापूर्वी दोन प्रशिक्षित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहलीबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी, तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास बचाव करण्याबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. सोबत प्रथमोपचार पेटी असावी, स्थानिक डॉक्टरांचे तसेच ज्या ठिकाणी सहल जाणार आहे तेथील शासकीय रुग्णालयांचे संपर्क क्रमांक सोबत ठेवावेत. सहलीचा आराखडा पालकांपर्यंत पोहोचवला जावा, पालकांच्या सूचनाही विचारात घ्याव्यात. विद्यार्थी व पालकांकडून संमतीपत्रक घेणे बंधनकारक आहे. यासह सहली नेताना आरटीओने मान्य केलेल्या वाहनांतूनच सहली घेऊन जाव्यात. सहलीसाठी शाळा व्यवस्थापनाची परवानगी घेण्यात यावी, शाळेत सहल समिती स्थापन करावी. शिक्षक-पालक-विद्यार्थी यांचे प्रबोधन करावे.>शालेय अभ्यासक्रमांतर्गत शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते. मात्र, सहलीसाठी घालण्यात आलेल्या अटी जाचक असल्याने अडचण निर्माण झाली आहे. अशा जाचक अटींमध्ये काहीशी शिथिलता आणावी.- सूर्यकांत भसे, प्राचार्य, ज्ञानदीप विद्यालय, रुपीनगर