शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करा!

By admin | Updated: December 22, 2015 01:15 IST

पूर्णानगर येथील मीरा हाइट्सच्या इमारतीची तपासणी करण्याचे व स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा आदेश महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी दिला.

पिंपरी : पूर्णानगर येथील मीरा हाइट्सच्या इमारतीची तपासणी करण्याचे व स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा आदेश महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी दिला. सीमाभिंत पाडून ती पूर्णपणे नव्याने बांधण्याचा आदेशही बांधकाम व्यावसायिकाला देण्यात आला. महापालिकेचे आयुक्त जाधव व प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव यांनी इमारतीची पाहणी केली. ही इमारत राहण्यायोग्य आहे का नाही, हे ठरविण्यात येणार आहे. मातीचा भराव खचल्याने पूर्णानगर येथील मीरा हाइट्स या इमारतीची सीमाभिंत शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कोसळली. त्यामुळे इमारतीला धोका निर्माण झाला असून, प्राधिकरणाने रहिवाशांना घर खाली करण्यास सांगितले होते. या भागात खाणी व नाले बुजवून इमारती उभ्या केल्या आहेत. त्यामुळे जमीन खचण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. वर्षभरातील ही दुसरी घटना आहे. या इमारतीच्या तळात मुरमाऐवजी मातीचा भराव टाकला आहे. या इमारतीत १२ सदनिका आहेत. या वेळी प्राधिकरणाचे उपसंचालक एम. वाय. देवडे, धैर्यशील खैरे, नगरसेवक दत्ता साने व अजय सायकर उपस्थित होते.चिखली, पूर्णानगर, शिवतेजनगर हा संपूर्णत: खाणी व नाल्यांचा परिसर आहे. बिल्डर लॉबीने प्राधिकरणाकडून जमिनी खरेदी केल्या. या खाणीत दगड, मातीचा भराव टाकून बहुमजली इमारती उभ्या केल्या. मातीच्या भरावामुळे जमीन खचून वारंवार अपघात होत आहेत. माती व दगडाच्या भरावावर उभारलेल्या इमारतींना भविष्यात धोका संभवू शकतो. पैसा जमा करून आयुष्याची पुंजी घरासाठी लावणाऱ्या रहिवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत. येथील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्राधिकरणाने इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र देताना इमारतीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने असलेल्या सर्व बाजू तपासाव्यात. तसेच परिसरात आजही अशा इमारती उभारल्या जात असून, त्याबाबतही प्राधिकरणाने त्वरित निर्णय घ्यावा. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना टाळता येतील, असे नागरिकांचे म्हणणे आहे. अधिकारी बिल्डरधार्जिणे निर्णय का घेतात, पूर्णानगरसारख्या घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असे प्रश्न विचारले जात आहेत.(प्रतिनिधी)उत्कृष्ट दर्जाचे काम केले, तर असे प्रकार घडणार नाहीत. पाया भक्कम नसेल आणि वर कितीही चांगले काम केले, तर त्याचा उपयोग नाही. सीमाभिंत ताबडतोब बांधून घेऊन इमारतीच्या पायाशी भर घालावी. इमारतीचे सांडपाणी बाहेर जाण्यासाठी वाट नाही. त्यासाठी वाट निर्माण करावी लागेल. या परिसरात जे मोकळे भूखंड आहेत. तेथे भराव टाकण्यात येणार आहे.- सुरेश जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी