शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

विसर्जन मिरवणूक : कलावंतांचा पर्यावरणपूरक संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 02:25 IST

पिंपरी शहरातील कला, साहित्य, चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनीही गणरायाला निरोप दिला. जल, ध्वनी, वायुप्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला.

पिंपरी - शहरातील कला, साहित्य, चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनीही गणरायाला निरोप दिला. जल, ध्वनी, वायुप्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला. पिंपरी-चिंचवड या स्मार्ट सिटीत साहित्य, कला, शिक्षण आणि चित्रपट सृष्टीतील मान्यवर वास्तव्यास आहेत. नटरंग फेम सोनाली कुलकर्णी या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील निगडी येथे राहतात. सोनाली यांनी आपल्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली होती. रविवारी सकाळी आई सविता, वडील मनोहर, भाऊ आणि सोनाली कुलकर्णी यांनी गणरायाला निरोप दिला.सोनाली या दरवर्षी आकुर्डीतील गणेश तलाव येथे दरवर्षी गणेश विसर्जन करत असतात. मात्र त्यांनी या वर्षी घरात पर्यावरणपूरक शाडूची मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी कुटुंबीयांसमवेत गणरायाला निरोप दिला व घरातील हौदात गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन केले.सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘गणेशोत्सव दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे ही काळाची गरजआहे. सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.’’दरम्यान, अगं बाई अरेच्या फेम प्रियांका यादव या चिंचवड बिजलीनगर येथे राहतात. त्यांनीही गणरायाला निरोप दिला़ तिने बहिणीसमवेत चिचवड स्टेशनयेथील श्री छत्रपती शाहू तरुण मंडळाच्या गणेशोत्सव मिरवणुकीत सहभाग घेतला होता. प्रियांका यादव म्हणाल्या, ‘‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी म्हणून गणेशोत्सवाची सुरुवात केली. उत्सवाचा लौकिक दिवसेंदिवस वाढत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे.महापौरांनी टिपली सोहळ्याची क्षणचित्रेचिंचवडच्या चापेकर चौकात पोलिसांच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्वागतकक्षात महापौर राहुल जाधव छायाचित्रणाचा आनंद घेताना पाहायला मिळाले. मिरवणुकीची क्षणचित्रे आपल्या कॅमेऱ्यात टिपत होते. अकरा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी आपल्या लाडक्या बाप्पाला गणेश मंडळांकडून निरोप दिला जात होता. विसर्जन मिरवणुकीत मंडळांनी आकर्षक सजावटी केल्या होत्या. पोलिसांनी उभारलेल्या मंडपात राजकीय मंडळीची गर्दी होती. तर मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. पोलिसांच्या वतीने उभारलेल्या स्वागत कक्षातही गर्दी झाली होती. महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते गणेश मंडळांचे स्वागत केले. याच ठिकाणी बसून महापौरांना मिरवणुकीची क्षणचित्रे आपल्या कॅमेºयात टिपली.महापालिकेला स्वागत कक्षाचा विसरसांस्कृतिक व संस्कृती रक्षणाचे गोडवे गाणाºया पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला गणेश फेस्टिव्हल, गणेश सजावट स्पर्धा याचबरोबर गणेशभक्तांचा स्वागत कक्ष उभारण्याचा विसर पडला आहे. सण-उत्सव साजरे करण्यावर स्वायत्त संस्थांना उच्च न्यायालयाने बंधने घातल्याने यंदा चिंचवडगावातील चापेकर चौकात असणारा महापालिकेचा स्वागत कक्ष उभारण्यात आलेला नव्हता. पोलीस आयुक्तालयाने उभारलेल्या स्वागत कक्षातूनच गणेश मंडळांचे स्वागत करण्यात येत होते.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड