शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक मतदानाची वेळ वाढणार सात सेकंदांनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 03:10 IST

मतदान केल्यानंतर दिसणार मतदानाची माहिती

पुणे : मतदान यंत्राद्वारे दिलेले मत योग्य व्यक्तीला दिले की नाही हे समजण्यासाठी मतदानानंतर सात सेकंद संबंधित उमेदवाराचे नाव, अनुक्रमांक आणि चिन्ह मतदान यंत्रावरील स्लिपवर दिसणार आहे. त्यामुळे मतदाराची खात्री पटणार असली, तरी प्रत्येक मतदार सात सेकंद अधिक वेळ घेणार आहे. त्यामुळे मतदानाला पूर्वीपेक्षा अधिक वेळ लागेल.मतदान यंत्र हॅक होऊ शकते, यंत्रावरील कोणत्याही उमेदवारा समोरील बटण दाबल्यास ठराविक पक्षास मत जाते अशी शंकादेखील उपस्थित करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या यंत्रात मतदान कोणाला दिले गेले, हे समजण्याची सुविधा देण्यात आली आहे. मतदारांमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राची माहिती देण्यासाठी आणि निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने शनिवारी राजकीय प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावली होती.अप्पर जिल्हाधिकारी डॉ. ज्योत्स्ना पडियार यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राची प्रात्यक्षिकासह माहिती दिली. मतदान यंत्रावर मतदान केल्यानंतर त्याला जोडलेल्या व्हीव्हीपॅट यंत्रावर सात सेकंदांसाठी संबंधित उमेदवाराचे नाव, अनुक्रमांक आणि चिन्ह स्लिपवर दिसेल. त्यानंतर संबंधित स्लिप व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये जाईल. या मुळे मतदाराला आपण केलेले मतदान योग्य व्यक्ती आणि चिन्हावरच गेले असल्याची खात्री पटेल. निवडणूक कामकाजाची माहिती देताना उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह म्हणाल्या, जिल्ह्याला ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्र प्राप्त झाले असून, भोसरी येथील गोदामात त्यांची प्राथमिक तपासणी सुरु आहे.जिल्ह्यात ३१ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार २ लाख ८८८ मतदारांची नव्याने नोंदणी झाली आहे. त्यानंतर राबविण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांची संख्या पाहता आणखी १६१ मतदान केंद्रांची संख्या वाढणार आहे. दिव्यांग मतदारांची नावे तळमजल्यावर अथवा पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्रातच राहतील याची दक्षता घेण्यात येत आहे.

टॅग्स :VVPATव्हीव्हीपीएटीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९