शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएमपी’कडून होतेय धूळफेक

By admin | Updated: June 12, 2017 01:26 IST

पीएमपीने पिंपरी-चिंचवडमध्ये किती बस वाढविल्या आणि उत्पन्नात किती वाढ झाली, हे सांगणे म्हणजे नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पीएमपीने पिंपरी-चिंचवडमध्ये किती बस वाढविल्या आणि उत्पन्नात किती वाढ झाली, हे सांगणे म्हणजे नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार आहे. २००७ आणि २०१७ च्या लोकसंख्येत दुप्पट वाढ झाली असताना शहरांतर्गत बससेवा सक्षम नाही, हा खरा मुद्दा आहे. शहरांतर्गत बससेवेची काय स्थिती आहे, याबाबत पीएमपीचे अध्यक्षांनी जनतेला सांगावे. शहरात फेरफटका मारून वस्तुस्थिती जाणून घ्यावी, अशी मागणी स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी केली आहे. सावळे म्हणाल्या, ‘‘पिंपरी-चिंचवडमधील अंतर्गत बसव्यवस्था सक्षम करावी आणि आसपासच्या गावांना शहराशी जोडण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. परंतु, पीएमपी प्रशासन २००७ आणि २०१७ मधील आकडेवारी प्रसिद्ध करून केवळ स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. २००७ मध्ये पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या दहा लाखांच्या घरात होती. २०१७ मध्ये ती २२ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. या दहा वर्षांत पुण्याचीही लोकसंख्या दुप्पट झाली आहे. त्यामुळे पुण्यातील प्रवासीही पिंपरी-चिंचवडमध्ये दररोज हजारोंच्या संख्येने येतात. लोकसंख्या दुप्पट झाली म्हणून पीएमपीच्या उत्पन्नातही वाढ होणे अपेक्षित आहे आणि तशी वाढ झाली आहे. पूर्व पीएमपी आणि पूर्व पीसीएमटी अस्तित्वात असताना शहरातून पुण्याच्या सर्व प्रमुख भागात बस धावत होत्या.