शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

वाहनचालकांनीच घातला वाहतूक पोलिसांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 06:44 IST

वाहतुकीच्या नियमभंगामुळे दंड ठोठावलेल्या सव्वा लाखाहून अधिक वाहनचालकांनी दंडाची तब्बल ४ कोटी रुपयांहून अधिक रक्कम भरली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे

विशाल शिर्केवाहतुकीच्या नियमभंगामुळे दंड ठोठावलेल्या सव्वा लाखाहून अधिक वाहनचालकांनी दंडाची तब्बल ४ कोटी रुपयांहून अधिक रक्कम भरली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या पैकी एकाही वाहनचालकाने प्रामाणिकपणे नंतर दंडाची रक्कम जमा केलेली नाही.सिग्नल तोडणे, एकेरी वाहतुकीतून विरुद्ध दिशेने वाहन दामटणे, वाहन परवाना आणि हेल्मेट नसणे, सिटबेल्ट न लावणे अशा विविध वाहतुकीच्या नियमभंगप्रकरणी दररोज हजारो वाहनचालकांना कारवाईला सामोरे जावे लागते. मार्च २०१७ पासून शहरात वाहतूक नियमभंगाचा दंडभरण्यासाठी ई-चलन सुरु करण्यात आले आहे. ई चलन यंत्रामार्फत एटीएम कार्ड स्वाइप करुन दंडाची रक्कम भरता येते. तसेच आॅफलाइन पद्धतीने एका मोबाइल कंपनीच्या स्टोअर्समध्येच पैसे भरता येतात. परिणामी जर एखाद्या वाहनचालकाच्या एटीएममध्ये पुरेसे पैसे नसतील, अथवा त्याच्याकडे एटीएम नसेल आणि आॅफलाइनचे स्टोअर्सदेखील जवळ नसल्यास संबंधित वाहनचालकांना नंतर येऊन दंड भरण्याची मुभा दिली जाते. अशी सर्व प्रकरणे ‘अनपेड’ या शीर्षकाखाली जातात. ई-चलन पद्धती सुरु झाल्यापासून शहरात अनपेड वाहनचालकांची संख्या वाढत आहे. शहरात २९ मार्च २०१७ ते ३० जुलै २०१७ या कालावधीत १ लाख ७१ हजार ७०३ वाहनचालकांनी वाहतूक नियमभंगप्रकरणी ३ कोटी ८६ लाख ८५ हजार ८२५ रुपयांचा दंड भरलाहोता. याच कालावधीत १ लाख ३४ हजार १०८ वाहनचालकांनी ४ कोटी ३८ लाख १२ हजार १०५ रुपये रक्कम भरली नव्हती.दंडात्मक कारवाई केलेल्या अनपेड श्रेणीतील एका वाहनावर पाचपेक्षा अधिक नियमभंग असल्यास, त्यांना दंडाची नोटीस बजावण्याचे धोरण पोलिसांच्या वाहतूक विभागाने स्वीकारले आहे. त्यामुळे बहुतांश वाहनचालकांची दंडातून आपोआपच सुटका होणार आहे. वाहतूक नियमभंग केल्यानंतर तत्काळ दंड भरणाºयांपेक्षा, दंड न भरणाºया वाहनचालकांच्या दंडाची रक्कम अधिक आहे. वाहतूक विभागाकडे ३० जुलै २०१७ अखेर ई-चलनद्वारे ३ कोटी ८६ लाख ८५ हजार ८२५ रुपयांचा दंड जमा झाला होता. तर अनपेड शीर्षकाखालील दंडाची रक्कम ही ४ कोटी ३८ लाख १२ हजार १०५ रुपये होती. या अनपेड केसपैकी एकाही व्यक्तीने नंतर दंडाची रक्कम भरलेली नाही. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस