शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
4
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
5
VIDEO: "दीदी, हा कप तुमच्यासाठी....", हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष
6
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
7
एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
8
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
9
पशुपतिनाथाचे अवतार आणि रक्षेतून प्रगट झाले असे गोरक्षनाथ यांची जयंती; वाचा त्यांचे कार्य!
10
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
11
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
12
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
13
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
14
आणखी एक मोठा बस अपघात, भरधाव ट्रकने बसला समोरून दिली धडक, २० जणांचा मृत्यू
15
मोठा निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, १ तास मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू
16
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
17
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
18
अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."
19
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
20
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?

रस्ता खोदल्याने वाहतुकीस अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 02:39 IST

वाल्हेकरवाडी, रावेत, किवळे मार्गावरील मुख्य रस्ता महावितरण कंपनीच्या ठेकेदाराने केबल टाकण्यासाठी सर्वत्र खोदला आहे. वाल्हेकरवाडी ते रावेत मुख्य बीआरटीएस चौकापर्यंतचा रस्ता अर्धवट बुजविल्याने येथील अपघात आणि वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे खड्डे पूर्णपणे बुजवून रस्ता दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

रावेत - वाल्हेकरवाडी, रावेत, किवळे मार्गावरील मुख्य रस्ता महावितरण कंपनीच्या ठेकेदाराने केबल टाकण्यासाठी सर्वत्र खोदला आहे. वाल्हेकरवाडी ते रावेत मुख्य बीआरटीएस चौकापर्यंतचा रस्ता अर्धवट बुजविल्याने येथील अपघात आणि वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे खड्डे पूर्णपणे बुजवून रस्ता दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.महावितरण कंपनीने या मार्गावर विविध ठिकाणचे रस्ते आणि पदपथ खोदल्याने रावेतकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच सेवा उपयोगिता कंपन्यांनी केबल टाकण्यासाठी चर खणण्यास सुरुवात केली आहे. परिणामी वाल्हेकरवाडी, रावेत, किवळे या रस्त्यांचा पुरता बोजवारा उडाला आहे. ‘खड्डेच खड्डे चोहीकडे’ अशी परिस्थिती आहे. अनेक ठिकाणचे लहान-मोठे रस्ते खड्डे खणून ठेवल्यामुळे व काही अर्धवट अवस्थेत बुजविल्याने त्याचा राडारोडा रस्त्यावर पडलेला आहे. काही ठिकाणी केबल व्यवस्थित न लावल्याने रस्त्यावरच पडून आहेत. त्यामुळे वाहतुकीचे मार्ग वळवावे लागले आहेत. काही ठिकाणी रस्ता खोदून, अर्धा रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे. मात्र वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या निम्म्या रस्त्यावर वाहनांची प्रचंड कोंडी होत आहे. त्याचा फटका पादचाऱ्यांनाही बसू लागला आहे. काही पदपथांवरील पेव्हर ब्लॉक या कामासाठी उखडण्यात आले आहेत. हे ब्लॉक रस्त्यावर पडून असल्याने वाहतुकीस अडथळा ठरत आहे. पदपथ खोदल्याने पादचाºयांना रस्त्यांवरून चालावे लागत आहे.आयुक्तांनादिले निवेदनरस्ता खोदल्याने वाहनचालकांना येथे कसरत करावी लागत आहे. त्यामुळे खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी केली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे त्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. ठेकेदाराकडून तत्काळ या मार्गावरील सर्व खड्डे बुजवून खोदलेला रस्ता डांबरीकरण करून पूर्ववत करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.सुरक्षेबाबत दक्षता न घेता रस्ताखोदाईरावेत बीआरटीएस चौक ते किवळेपर्यंतचा रस्ता चुकीच्या पद्धतीने खोदल्याने व त्याचा राडारोडा रस्त्यावरच टाकल्याने दररोज सायंकाळी येथे वाहतूककोंडी होत आहे. ठेकेदाराने काम करताना दक्षता घेतल्याचे दिसून येत नाही. काम सुरू असल्याबाबतचे सूचना फलक, बॅरिकेडस, दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रस्त्यावर असणारे खड्डे आणि केबल लक्षात येत नाही. त्यामुळे अपघातासह वाहतूककोंडीत वाढ झाली आहे. राडारोडा हळूहळू पूर्ण रस्त्यावर पसरला आहे. त्यामुळे वाहने घसरून अपघात होत आहेत. याच मार्गावर केबल उघड्यावरच ठेवल्या आहेत. त्यामुळेसुद्धा वाहतूककोंडी होत आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड