शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नाट्य संमेलन पिंपरी-चिंचवडला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 02:38 IST

उद्योगनगरीतून नियामक मंडळाकडे प्रस्ताव : निवडणुकीतील राजकारणाच्या पडसादाची चिन्हे

- विश्वास मोरेपिंपरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने होणाऱ्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रेमानंद गज्वी यांची निवड झाली असून, नागपूर, लातूर आणि पिंपरी-चिंचवडने संमेलनासाठी मागणी केली आहे. मात्र, नियामक मंडळाच्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीतील राजकारणाचे पडसाद संमेलनावर पडणार असल्याची चिन्हे दिसत असून, पिंपरी-चिंचवडकरांची नाट्य संमेलनाची मागणी पूर्ण होणार की नाही, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. संमेलनस्थळाचे नाव गुलदस्तात आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळाची निवडणूक मार्च महिन्यात झाली होती. त्या वेळी नाट्यनिर्माते प्रसाद कांबळे विरुद्ध डॉ. अमोल कोल्हे असे पॅनेल रिंगणात उतरले होते. रंगकर्मीच्या आखाड्यात राष्टÑवादी, शिवसेना आणि भाजपाही अप्रत्यक्षपणे उतरली होती. डॉ. कोल्हेंच्या मागे तत्कालीन उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी आपली शक्ती लावली होती. मात्र, ऐनवेळी राष्टÑवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी जातीने लक्ष घातल्याने डॉ. कोल्हे पॅनेलचा धुव्वा उडाला होता. राष्टÑवादीत असूनही भोईरांचा पराभव झाला होता. कोल्हेंवर कांबळे यांनी मात केली होती.

दरम्यान, या वर्षीच्या नाट्य संमेलन अध्यक्षपद निवडणूक आणि संमेलन स्थळाबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. अध्यक्षपदासाठी गज्वी यांच्यासह अशोक समेळ, श्रीनिवास भणगे आणि मावळातील सुरेश साखवळकर यांचे अर्ज आले होते. शुक्रवारी गज्वी यांची निवड जाहीर करण्यात आली.

शहरामध्ये ६९ वे अखिल भारतीय नाट्य संमेलन झाले होते. प्रा. रामकृष्ण मोरे आणि नाट्य परिषदेने त्याचे यजमानपद स्वीकारले होते. त्याचे अध्यक्ष डॉ. बाळ भालेराव हे होते. त्यानंतर २०१६ मध्ये शहरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. डॉ. डी. वाय़ पाटील विद्यापीठाचे प्रमुख आणि स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी अभूतपूर्व असे संमेलन केले होते. त्यानंतर जानेवारी २०१९ मध्ये होणाºया ९९ व्या नाट्य संमेलनासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने पत्र दिले आहे.राजकारणाचा साखवळकरांना फटकापुणे परिसरात प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीसाठी सुरेश साखवळकर यांनी काम केले आहे. मावळात त्यांनी कला आणि रंगभूमीसाठी योगदान दिले आहे. गेल्या वर्षीही पिंपरी-चिंचवडकरांनी पुणेकरांनी त्यांचे नाव लावून धरले होते. मात्र, यावर्षी नाट्य परिषदेवर मुंबईकरांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. त्यामुळेच पुण्यातील कलावंताला डावलले असावे, नाट्य क्षेत्रातील अंतर्गत कुरघोड्यांचा फटका त्यांना बसल्याची नाट्य वर्तुळात चर्चा आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये १९९९ साली नाट्य संमेलन झाले होते. ते शहराने यशस्वी केले होते. त्यानंतर २०१९ मध्ये पिंपरीत नाट्य संमेलन व्हावे, यासाठी पत्र दिले आहे. नाट्य रसिकांच्या मागणीचा विचार केला जावा. कलाक्षेत्रात कोणतेही राजकारण होणार नाही. एवढीच अपेक्षा आम्ही करतो.- भाऊसाहेब भोईर, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा