शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
3
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
4
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
5
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
6
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
7
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
8
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
10
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
11
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
12
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
13
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
14
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
15
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
16
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
17
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
18
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
19
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
20
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त

प्रारूप प्रभागरचनेवर आज शिक्कामोर्तब

By admin | Updated: October 7, 2016 04:04 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभागरचना शुक्रवारी जाहीर होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच प्रभागरचनेचा आराखडा भाजपा आणि राष्ट्रवादीच्या वर्तुळात

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभागरचना शुक्रवारी जाहीर होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच प्रभागरचनेचा आराखडा भाजपा आणि राष्ट्रवादीच्या वर्तुळात फुटला आहे. आराखडा जाहीर होण्यापूर्वीच या पक्षांनी आपले संभाव्य उमेदवार निवडण्याची तयारी सुरू केली आहे. लोकमतला मिळालेल्या संभाव्य आराखड्यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब होणार आहे. आराखडा जाहीर होण्यापूर्वी दोन्ही पक्षांचे नेते आणि इच्छुक कामाला लागले आहेत. महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ला होणार आहे. निवडणूक २०११च्या जनगणनेनुसार होणार आहे. त्या वेळी १७ लाख, २७ हजार, ६९२ लोकसंख्या होती. त्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या २ लाख ७३ हजार ८१० असून, अनुसूचित जमातींची लोकसंख्या ३६ हजार ५३५ आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणे टाकण्यात आली आहेत. बहुसदस्यीय प्रभाग प्रद्धतीनुसार ही निवडणूक होणार आहे. १२८ वॉर्डांपैकी प्रत्येक प्रभागात ४ असे ३२ प्रभाग असणार आहेत. प्रारूप आराखडा शुक्रवारी सकाळी जाहीर केला जाणार असून, आरक्षण सोडतही जाहीर होणार आहे. ३२ प्रभागांसाठी १२८ जागांसाठी सोडत काढण्यात येणार असून, त्यात सर्वसाधारण गटाच्या ७०, ओबीसी ३५, अनुसूचित जातीसाठी २०, अनुसूचित जमातींसाठी ३ जागांचे आरक्षण काढण्यात येणार आहे. याविषयीची रंगीत तालीम झाली असून, निवडणूक विभाग सोडतीसाठी सज्ज झाला आहे.प्रत्येक प्रभागात एक जागा ही ओबीसीसाठी आरक्षित असून ३२ आणि अनुसूचित जाती आणि जमातींसाठीचे २३ अशी आरक्षणे लोकमतने सर्वप्रथम प्रकाशित केली होती. ५५ जागांची संभाव्य आरक्षणे लोकमतने प्रकाशित केली होती. उर्वरित आरक्षणे ड्रॉद्वारे काढण्यात येणार आहेत. प्रारूपरचनेत हस्तक्षेप झाल्याचे वृत्त सर्वप्रथम लोकमतने प्रकाशित केले होते. त्यानंतर आरक्षणे सर्वप्रथम जाहीर केल्याने महापालिका प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावरून सत्ताधाऱ्यांनी प्रभागरचनेत हस्तक्षेप केल्याचे सिद्ध होते. चिंचवडला सर्वाधिक प्रभाग४महापालिका निवडणुकीत सर्वाधिक प्रभाग चिंचवड विधानसभेत असणार असून, त्यापाठोपाठ भोसरी आणि पिंपरीत असणार आहेत. सर्वाधिक प्रभाग म्हणजे ५२ वॉर्ड चिंचवडमध्ये असणार आहेत. त्यामुळे चिंचवडकरांची भूमिका सत्तेत निर्णायक ठरणार आहे. प्रभागनिहाय सदस्य संख्या पुढीलप्रमाणे-आरक्षणअनुसूचित अनुसूचित नागरिकांचासर्वसाधारणएकूणजातीजमातीमागासवर्गसर्वसाधारण१००११७३६६४महिला१००२१८३४६४एकूण२००३३५७०१२८