कामशेत : मावळचा ऐतिहासिक वारसा सांगणा-या किल्ल्यांपैकी एक म्हणजे किल्ले तुंग ऊर्फ कठीण गड. सह्याद्री प्रतिष्ठानने या किल्ल्यासाठी लोकवर्गणीतून सुमारे लाख रुपयांचा सागवानी दरवाजा तयार केला आहे़ तो येत्या विजयादशमीला बसविला जाणार आहे.तसे पाहिले तर तुंग किल्ला जास्तच दुर्लक्षित आहे. मात्र, याच किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात इ. स. पूर्व २०० ते ५०० वर्ष या कालखंडातील अर्वाचीन गुंफांचे अस्तित्व असलेला किल्ला म्हणून ही एक वेगळी ओळख आहे. मावळातील एकूण आठ किल्ल्यांपैकी हा सर्वांत उंच किल्ला आहे. या किल्ल्याची काही वर्षांमध्ये दुरवस्था होत असल्याने सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून येथे दुर्ग संवर्धनाच्या मोहिमा राबवल्या जात आहेत. यातूनच या किल्ल्याच्या मुख्य दरवाजाला सागवानी ऐतिहासिक पद्धतीचा दरवाजा बसवण्याचा निर्धार करून त्यासाठी लोकवर्गणीच्या माध्यमातून एक लक्ष रक्कम जमा केली. येत्या विजयादशमीला हा दरवाजा गडावर बसवण्यात येणार आहे.तीन द्वारांमध्ये २५ फूट आत गेल्यानंतर पाणी असून त्यामुळे आत जाणे शक्य होत नाही. पहिली गुहा ४७ फूट आत गेल्यानंतर उजव्या बाजूला कोरीव पायºया चढून गेल्यास ४० बाय १५ फुटांची भुयार निदर्शनास येतात. पुढे १४७ फूट आत गेल्यावर या पद्धतीचे भुयार आहे. येथे आॅक्सिजन चे प्रमाण अत्यल्प आहे.
लोकवर्गणीतून तुंगसाठी साकारला सुमारे लाख रुपयांचा दरवाजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:28 IST