शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

डॉजबॉल स्पर्धा : म्हाळसाकांत, मॉडर्नचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 01:28 IST

ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाचीही बाजी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने भोसरी येथे डॉजबॉल स्पर्धा पार पडल्या. यामध्ये १७ वर्षे मुलींच्या गटात निगडीतील यमुनानगर येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलने तर मुलांच्या गटात निगडीतील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाने यश संपादन केले. यासह १९ वर्षे मुलींच्या आणि मुलांच्या गटात आकुर्डीतील म्हाळसाकांत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने बाजी मारली.

भोसरीतील इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा समितीचे सभापती संजय नेवाळे यांच्या हस्ते झाले. या वेळी नगरसेवक विलास मडिगेरी, क्रीडाधिकारी रज्जाक पानसरे, गुरुराज कुलकर्णी, स्पर्धाप्रमुख क्रीडा पर्यवेक्षक आशा ढवळे, भगवान सोनवणे, आत्माराम महाकाळ, युवराज गवारी, बाळासाहेब काळभोर, कमलाकर कांबळे आदी उपस्थित होते. विनायक कदम, सागर माळी, सुशांत म्हावरकर, अनुराग हिंगे, अनिल दाहोत्रे यांनी पंच म्हणून काम पाहिले, तर महाराष्ट्र राज्य डॉजबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष भगवान सोनवणे यांनी पंचप्रमुख कामकाज पाहिले. या स्पर्धेत ७० शाळांतील सातशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. क्रीडाशिक्षक सुभाष जावीर यांनी सूत्रसंचलन केले. आत्माराम महाकाळ यांनी आभार मानले.

१७ वर्षे मुलींच्या गटात उपांत्यफेरी पिंपरीतील जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने बोपखेलमधील जे.जे. इंटरनॅशनल स्कूल विरुद्ध विजय मिळविला. विजयी संघाकडून संजना परदेशी, उमंग परदेशी, सानिका तरडे यांनी पराभूत संघाकडून अनुजा सिंग, मनीषा जयस्वाल, साक्षी पवार यांनी उत्कृष्ट खेळ केला.यासह अंतिम सामन्यात निगडीतील यमुनानगर येथील मॉडर्न इंग्लिश मीडिअम हायस्कूलने पिंपरीतील जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा पराभव करीत यश संपादन केले. विजयी संघाकडून प्रतीक्षा गाडेकर, पूजा साळवे, अमिषा नाईक यांनी, तर पराभूत संघाकडून उमंग परदेशी, सानिका तरडे, संजना परदेशी यांनी उत्कृष्ट खेळ केला. जे. जे. इंटरनॅशनल स्कूलचा संघ तृतीय क्रमांकासाठी पात्र ठरला.१९ वर्षे मुलांच्या गटात उपांत्य फेरी १ मध्ये आकुर्डीतील म्हाळसाकांत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने निगडीतील मॉडर्न हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा पराभव केला. विजयी संघाकडून अनिकेत टापसे, आदित्य निकम, श्रेयस थोरात यांनी तर पराभूत संघाकडून विवेक कासार, आशिष दांगडे यांनी चांगला खेळ केला.उपांत्यफेरी २ मध्ये राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक महाविद्यालयाने चिंचवड येथील श्रीमती गोदावरी हिंदी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा पराभव केला. विजयी संघाकडून श्रेयश वाडेकर, विलास पळसंबकर, अनिकेत बिरादार यांनी तर पराभूत संघाकडून शिवम गुप्ता, समीर करीमखान यांनी चमकदार कामगिरी केली. अंतिम सामन्यात श्री म्हाळसाकांत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने राजमाता जिजाऊ शिक्षण संस्थेच्या कॉलेजचा पराभव केला. विजयी संघाकडून अनिकेत टापसे, आदित्य निकम, श्रेयस थोरात यांनी तर पराभूत संघाकडून विलास पळसंबकर, अनिकेत बिरादार यांनी उत्कृष्ट खेळ केला.

तृतीय क्रमांकासाठी श्रीमती गोदावरी हिंदी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज व मॉडर्न हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्यात लढत झाली. यामध्ये गोदावरी हिंदी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजने यश संपादन केले.यासह १७ वर्षे मुलांच्या गटात उपांत्य फेरी १ मध्ये पिंपरीतील जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने चिखली, जाधववाडी येथील अभिनव माध्यमिक विद्यालयाचा पराभव केला. विजयी संघाकडून अमित टेकाळे, दानिश दलाल, सिद्धेश्वर भोर यांनी, तर पराभूत संघाकडून जुबेर शेख, ओंकार शेडगे, बॉबी बागडे यांनी उत्कृष्ट खेळ केला. उपांत्य फेरी २ मध्ये निगडीतील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाने मॉडर्न इंग्लिश मीडिअम स्कूलचा पराभव केला. विजयी संघाकडून भुवन चिंचवडे, हर्षल काळे, अभिषेक साखरे तर पराभूत संघाकडून महेश पाटील, अनिकेत पवार यांनी उत्कृष्ट खेळ केला.४अंतिम फेरीत निगडीतील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाने पिंपरीतील जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा पराभव केला. यामध्ये विजयी संघाकडून अभिषेक साखरे, हर्षल काळे, भुवन चिंचवडे यांनी, तर पराभूत संघाकडून अमित टेकाळे, दानिश दलाल, सिद्धेश भोर यांनी चांगला खेळ केला.४तृतीय क्रमांकासाठी अभिनव माध्यमिक विद्यालय व मॉडर्न इंग्लिश मीडिअम स्कूल यांच्यात लढत झाली. यामध्ये अभिनव विद्यालयाने यश संपादन केले.४१९ वर्षे मुलींच्या गटात उपांत्य फेरी १ मध्ये भोसरीतील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक महाविद्यालयाने देहूरोड येथील लायन्स क्लब इंग्लिश मीडिअम स्कूलचा पराभव केला. विजयी संघाकडून श्वेता कळसाईत, आरती पवार, भावना उकिरडे यांनी, तर पराभूत संघाकडून मिनाज शेख, आफशाह शेख यांनी चांगला खेळ केला. उपांत्यफेरी २ मध्ये आकुर्डीतील म्हाळसाकांत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने निगडीतील मॉडर्न हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा पराभव केला.अंतिम फेरीत म्हाळसाकांत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक महाविद्यालयाचा पराभव करीत यश संपादन केले. विजयी संघाकडून वैष्णवी कुलकर्णी, हर्षिता पाटील, सत्यम सिंग यांनी, तर पराभूत संघाकडून आरती पवार, भावना उकिरडे यांनी उत्कृष्ट खेळ केला. तृतीय क्रमांकासाठी लायन्स क्लब इंग्लिश मीडिअम स्कूल व मॉडर्न हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या लढत झाली. यामध्ये लायन्स क्लब स्कूलने विजय मिळविला.

टॅग्स :Sportsक्रीडाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड