शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टी पुनर्वसनाचा सर्व्हे करा

By admin | Updated: September 15, 2015 04:15 IST

महापालिकेच्या वतीने शहरात अनेक महत्त्वाच्या मोकळ्या जागी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविला गेला आहे. या प्रकल्पाचे फेर सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.

- राहुल वडमारे,  पिंपरी महापालिकेच्या वतीने शहरात अनेक महत्त्वाच्या मोकळ्या जागी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविला गेला आहे. या प्रकल्पाचे फेर सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. तेथील झोपडपट्टी नाल्यांवर, गटारींवर होत्या. घाण कचरा, दुर्गंधी, दर वर्षी येणारा नदीला पूर यांमुळे तेथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. एवढ्या मोठा सामना करत असतानाही झोपडपट्टीधारक संकटाच्या वेळेस एकमेकांकरिता धावून जायचे. मदत करायचे. दादागिरी, गुंडगिरी, फसवेगिरी करणाऱ्यांविरुद्ध एकत्र येऊन विरोध करायचे. जसेच्या तसे उत्तर द्यायचे. अशांना पोलीस पकडायला आले, तर ते सापडायचे नाहीत. कारण झोपडपट्टीतल्या नागरिकालाच माहीत होते की, कुठली गल्ली बाहेर पडायची आहे. त्यामुळे पोलिसांची दमछाक व्हायची. अशा प्रकारे झोपडपट्टीतले लोकजीवन जगत होते.या सर्वांतून झोपडपट्टीधारकांना बाहेर काढण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात आला. मात्र, सत्य आज उलट आहे. ज्या वेळेस हे लोक झोपडपट्टीत राहत होते, तेव्हा ते समाधानी व गुण्यागोविंदाने राहत होते. परंतु, आज हे लोक चांगल्या स्वरूपातील घरे मिळूनही आम्हाला झोपडपट्टीच बरी होती, असे म्हण्याची वेळ आली आहे. कारण, या लोकांना येथे अनेक प्रकारच्या दादागिरीला, गुंडगिरीला नेतेगिरीला सामोरे जावे लागत आहे. दर आठ दिवसांनी या ठिकाणी काही तरी भांडणे होत आहेत. रात्री-बेरात्री आरडा ओरडीला सामोरे जावे लागत आहे. ही लोक अशिक्षित असल्यामुळे ते काय, अन्यायाविरुद्ध आवाज उठविणार आहेत. गरीब लोक काय न्याय मागणार आहेत? महापालिकेने ज्या उद्देशाने हा प्रकल्प राबविला, तो यशस्वी झाला का, याचे सर्वेक्षण झाले पाहिजे. ही संपत्ती महापालिकेचीच आहे. चुकीच्या गोष्टींवर निर्बंध लादणे हे गरजेचे आहे. लेखक - धम्मदीप प्रतिष्ठानाचे संस्थापक-अध्यक्ष आहेत.