शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शास्ती होणार कमी, सर्वसाधारण सभेत मंजुरी , अनधिकृतच्या नियमावलीत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 05:38 IST

महापालिका परिसरातील अनधिकृत बांधकामे नियमित व्हावीत, यासाठी धोरणात बदल करण्याची उपसूचना सर्वसाधारण सभेत मंजूर केली आहे. बदलांमुळे दंडाची रक्कम कमी होण्याबरोबरच, नियमावलीत सुसाह्य होणार आहे.

पिंपरी : महापालिका परिसरातील अनधिकृत बांधकामे नियमित व्हावीत, यासाठी धोरणात बदल करण्याची उपसूचना सर्वसाधारण सभेत मंजूर केली आहे. बदलांमुळे दंडाची रक्कम कमी होण्याबरोबरच, नियमावलीत सुसाह्य होणार आहे. हा विषय अंतिम मंजुरीसाठी राज्यशासनाकडे पाठविला जाणार असून, त्यांच्या मंजुरीनंतर अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामाचा मुद्दा अनेक दिवसांपासून गाजत आहे. त्यावर महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि भाजपाने डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतची नियमावली प्रसिद्ध केली. त्यानुसार अनधिकृत मिळकती नियमित करण्यासाठी पालिकेने अर्ज मागविले. त्यासाठी महापालिकेने स्वतंत्र कक्षही सुरू केला. गेल्या पाच महिन्यात केवळ नऊ अर्ज दाखल केले असून, त्यात सर्वाधिक अर्ज हे बांधकाम व्यावसायिकांचे आहेत.नागरिकांच्या सूचनांची दखलनियमावलीतील अटी जाचक असल्यामुळे नागरिक अर्ज करण्यास धजावत नाहीत. नागरिकांचा अल्प प्रतिसाद पाहता पालिकेने धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबतचे धोरण तयार करण्याचे काम सुरू असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. शिवाय नवीन धोरण तयार करताना प्रशासनाने नागरिकांच्या सूचना मागविल्या होत्या. भाजपा, राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस आदी राजकीय पक्षांनी तसेच सर्वपक्षीय नगरसेवक, पालिकेतील पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांच्याकडील सूचना नोंदवून घेतल्या. या सूचनांचा अंतर्भाव करून सुधारित नवीन धोरण तयार केले आहे. याबाबतच्या उपसूचना सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली.शासन मान्यतेनंतर अंमलबजावणीअनधिकृत बांधकाम नियमितीकरणासंदर्भात नियमावली सादर केल्यानंतर गेल्या काही कालखंडात त्यास प्रतिसाद मिळाला नव्हता, ही नियमावली जाचक असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. त्यात सुटसुटीतपणा आणण्याचा प्रयत्न केला आहे. सध्याच्या रेडीरेकनरनुसार दंडात्मक आकारणी केली जात होती. त्यामध्ये शिथिलता आणली असून नियमितीकरणासाठी आकारण्यात येणारे शुल्क कमी केले जाणार आहे. त्यामुळे दंडाची रक्कम कमी होणार आहे. महासभेने हा विषय मंजूर केला असून राज्यशासनाकडे तो पाठविला जाणार आहे. मंजुरीनंतर अंमलबजावणी केली जाईल, असे एकनाथ पवार यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड