शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

महापौर परिषदेत होणार हक्कासाठी चर्चा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 03:04 IST

महाराष्ट्र महापौर परिषदेची सभा पणजी, गोवा येथे आठ जानेवारीला होणार असून, त्यात महापौरांच्या हक्क आणि अधिकारांवर चर्चा होणार आहे. अधिकार वाढविण्यासाठी शासनाला साकडे घातले जाणार आहे.

पिंपरी - महाराष्ट्र महापौर परिषदेची सभा पणजी, गोवा येथे आठ जानेवारीला होणार असून, त्यात महापौरांच्या हक्क आणि अधिकारांवर चर्चा होणार आहे. अधिकार वाढविण्यासाठी शासनाला साकडे घातले जाणार आहे.महापौर परिषद, पणजी येथे होणार असून, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे सहा विषयांवर चर्चा होणार आहे. या परिषदेसाठी पिंपरीचे महापौर नितीन काळजे गोव्याला रवाना झाले आहेत. सोमवारी सकाळी दहाला ही परिषदेची सोळावी सभा होणार आहे. त्यात विषयपत्रिकेवर सहा विषय असणार आहेत. राज्य शासनाने २०१४ मध्ये जाहीर केलेल्या महिला धोरणानुसार राज्यातील महापालिकांच्या विकास आराखड्यात महिला उद्योग भवनासाठी जागा आरक्षित करण्यात यावी व उद्योग भवन उभारण्यासाठी शासनाकडून १०० टक्के अनुदान मिळावे. महापौरपदाचा दर्जा विचारात घेता त्यांना नागरिकांना सेवासुविधा पुरविण्यासाठी ठरावीक रकमेपर्यंतची कामे करण्याचा अधिकार देण्याबाबत महापालिका अधिनियमात दुरुस्ती करावी. महाराष्टÑ महापौर परिषदेचे उपाध्यक्षपद रिक्त झाले आहे. नवीन उपाध्यक्षांची निवड करणे, परिषदेच्या जमा-खर्चास मंजुरी देणे, तसेच आयत्या वेळी येणाºया विषयांवरही चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती नितीन काळजे यांनी दिली.महाराष्टÑ महापौर परिषदेचे उपाध्यक्षपद रिक्त झाले आहे. नवीन उपाध्यक्षांची निवड होणार आहे. त्यात कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे. तसेच परिषदेत चर्चा करून या संदर्भात शासनाकडे विविध मागण्यांसाठी पत्रव्यवहार आणि साकडे घातले जाणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या