शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

बक्षीस वितरणासाठी ‘ढोल बजाओ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 02:31 IST

महापालिकेसमोर निषेध; राष्ट्रवादीची स्टंटबाजी असल्याचा भाजपाचा आरोप

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सन २०१७ मध्ये घेतलेल्या गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले नाही. सत्ताधारी भाजपाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ढोल बजाओ आंदोलन केले.महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ढोल बजाविले. ढोलच्या दणदणाटाने पालिकेचा परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक मयूर कलाटे, राजू बनसोडे, नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे, विनया तापकीर, गणेश भोंडवे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अर्धा तास पालिकेसमोर ढोल वाजविले.विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, ‘‘महापालिकेच्या वतीने गतवर्षी घेण्यात आलेल्या गणेशोत्सव सजावट स्पर्धेत ६२ मंडळांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ३८ मंडळांना बक्षीस जाहीर झाले. त्यासाठी केवळ पाच लाख रुपये खर्च येणार आहे. परंतु, अद्यापही बक्षिसाचे वितरण करण्यात आले नाही. न्यायालयाच्या निर्णयाचे कारण दिले जाते. यामध्ये काहीतरी तोडगा काढणे अपेक्षित होते. अनेक न्यायालयाचे अनेक निर्णय आहेत. त्याचे पालन महापालिकेकडून केले जात आहे का. सत्ताधारी भाजपाला गणेश मंडळांना बक्षीस देण्याची प्रथा मोडीत काढायची आहे. पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हलदेखील त्यांनी बंद पाडला आहे. संस्कृती रक्षक असलेल्या सत्ताधाऱ्यांना परंपरा मोडीत काढायच्या आहेत. त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो.’’ संजोग वाघेरे म्हणाले, ‘‘ राष्ट्रवादीने सुरू केलेली चांगली परंपरा सत्ताधारी भाजपा मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे.’’गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे बक्षीसवितरण आणि पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल होणार असल्याचे जाहीर करूनही राष्ट्रवादी काँग्रेसनेआंदोलन केले. प्रसिद्धीसाठी ही केवळ स्टंटबाजी आहे. विरोधकांनी स्टंटबाजी करण्यापेक्षा महापालिकेच्या वतीने सर्वपक्षीय एकमत ठेवून उपक्रमात योगदान देणे गरजेचे आहे. - एकनाथ पवार, सत्तारुढ पक्षनेते

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिका