शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

‘आरटीओ’ असूनही खोळंबा, नागरिकांना हेलपाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 06:49 IST

कामकाज सुलभ व्हावे, त्यात सुसूत्रता व गतिमानता यावी यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात संगणक प्रणालीचा अवलंब केला जात आहे. मात्र,

पिंपरी : कामकाज सुलभ व्हावे, त्यात सुसूत्रता व गतिमानता यावी यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात संगणक प्रणालीचा अवलंब केला जात आहे. मात्र, या संगणक यंत्रणेत वारंवार व्यत्यय येत असल्याने गतिमान कामकाजाऐवजी ढीम्म कारभाराचा प्रत्यय नागरिकांना येऊ लागला आहे. शहरात आरटीओचे कार्यालय खुले असूनही काम मात्र ठप्प होत असल्याचा प्रकार अनेकदा घडतो. कधी सर्व्हर डाऊन तर कधी इंटरनेट समस्या या सबबींमुळे नागरिकांना आरटीओ कार्यालयाचे हेलपाटे नित्याचेच झालेत.वाहन चालविण्याचा परवाना काढायचा असेल, तर आॅनलाइन अपॉइंटमेंट घेणे भाग पडते. आॅनलाइन अपॉइंटमेंटसाठी दलालांची मदत घ्यावी लागते. आॅनलाइन अपॉइंटमेंट घेतल्यानंतर दुचाकीची चाचणी द्यावी लागते. अनेकदा सलग दोन ते तीन दिवस प्रयत्न करूनही आॅनलाइन अपॉइंटमेंट मिळत नाही. अन् मिळालीच तर महिना ते दीड महिना वाट पहावी लागते. त्यामुळे नडलेल्या ग्राहकांना दलालाकडे जाण्याशिवाय पर्याय उरत नाही.कार्यालयात अपुरे मनुष्यबळपूर्णानगर चिखली येथील कार्यालयासाठी ३८ पदांना शासनाची मंजुरी आहे. मात्र, २२ जागा रिक्त आहेत. कमी मनुष्यबळात अधिक काम करावे लागते. त्यामुळे खासगी व्यक्ती सहायक म्हणून काम करताना दिसून येतात. अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती संगणकावर असल्याने त्या त्या कर्मचाºयांना स्वतंत्र लॉगिन कोड आणि पासवर्ड दिलेले आहेत. बायोमेट्रिक पद्धतीने कोडिंग केले असल्याने संबंधित कर्मचाºयाच्या बोटाचे ठसे जुळले तरच लॉगिन होते. पुढील माहिती संगणकावर पाहता येते. अशी यंत्रणा कार्यन्वित केली असल्याने एखाद्याच्या संगणकावरील माहिती दुसºयाला पाहात येत नाही. परिणामी एखादी व्यक्ती रजेवर असेल, तर त्याच्या अनुपस्थितीत त्या विभागातील काम करता येत नाही. संबंधित कर्मचारी रजा संपवून ज्या वेळी कार्यालयात रुजू होईल. त्या वेळी संबंधित काम करणे शक्य होते. अशा स्वरूपाचे अनेक अडथळे कामकाजात वारंवार येत आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड