शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

दहाचे नाणे नाकारले; व्यापाऱ्यावर गुन्हा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 03:38 IST

व्यवहारात दहा रुपयांचे नाणे चलनात आहे. ते नाणे चलनात स्वीकारले जावे, अशा सूचना दिल्या आहेत. असे नाणे घेण्यास कोणी विरोध केल्यास त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले असताना, काही व्यापारी हे नाणे घेण्यास नकार देत आहेत. अशीच घटना पिंपरी, गांधीनगर येथे गुरूवारी दुपारी घडली असून

पिंपरी - व्यवहारात दहा रुपयांचे नाणे चलनात आहे. ते नाणे चलनात स्वीकारले जावे, अशा सूचना दिल्या आहेत. असे नाणे घेण्यास कोणी विरोध केल्यास त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले असताना, काही व्यापारी हे नाणे घेण्यास नकार देत आहेत. अशीच घटना पिंपरी, गांधीनगर येथे गुरूवारी दुपारी घडली असून, पोलिसांनी एका दुकानदाराविरुद्ध रविवारी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सूचना असताना, दहाचे नाणे नाकारणाºया दुकानदाराविरोधात तक्रार देण्यास गेलेल्या नागरिकालाच पोलिसांनी उर्मट वागणूक दिली.गांधीनगरमध्ये राहणाºया लाखन केवल रावळकर (वय ३८) यांनी तक्रार दिली आहे. लाखन यांच्या पत्नी तांदूळ आणण्यासाठी किराणा मालाच्या दुकानात गेल्या. त्या वेळी परिसरातील दुकानदारांनी त्यांच्याकडील दहाची नाणी स्वीकारण्यास नकार दिला. चौधरी नावाच्या दुकानदाराने नाणी परत केली. तक्रारदाराने दुकानदाराला नाणे नाकारण्याबाबत जाब विचारला. त्या वेळी नाणे चलनातून बाद केले आहे, असे उत्तर दुकानदाराने दिले. त्यानंतर लाखन यांनी शंभर नंबरवरून पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून उद्धट वागणूक मिळाली, असा तक्रारदाराने आरोप केला आहे. दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार देणाºया दुकानदारांविरोधात संत तुकारामनगर पोलीस चौकीत अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.गांधीनगर येथील किराणा मालाचे दुकानदार गोविंद चौधरी, सुरेश चौधरी व आणखी एक व्यापारी अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.पोलीस अनभिज्ञ : ग्राहकांना मनस्तापपिंपरी पोलिसांना याबाबत कळविले मात्र, त्यांनी या घटनेकडे गांभिर्याने पाहिले नाही. तक्रारदारास उर्मट वागणूक देत ते म्हणाले, दहा रुपयाचे नाणे चलनात नाही तर तू दुकानदाराला कशासाठी दिले? तुलाच पोलीस कोठडीत टाकतो, असे सुनावले. तक्रार देण्यास गेलेल्या ग्राहकास पोलिसांकडून योग्य प्रकारे सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते विष्णू सरपते व इतरांची मदत घेतली. संत तुकारामनगर पोलीस चौकीत जाऊन संबंधित व्यापाºयांविरुद्ध तक्रार दाखल करून घ्यावी असा आग्रह धरला. रिझर्व्ह बँकेने दहा रुपयाचे नाणे चलनातून बंद केले नसताना ग्राहकांची अडवणूक केली जात आहे. पोलिसांनी याची गांभिर्याने दखल घ्यावी, असे सांगितल्यानंतर व्यापाºयांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrimeगुन्हा