शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

आंदोलकांची मागणी : नराधमांना कठोर शिक्षा द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 02:43 IST

पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढून अत्याचाराच्या घटनांचा निषेध

रावेत : हिंजवडीलगतच्या कासारवाई आणि पिंपरी-चिंचवड शहरात माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडल्या. त्यामधील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी व महिला सुरक्षिततेसाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी छावा मराठा युवा संघाच्या महिला आघाडीतर्फे करण्यात आली आहे. पिंपरी येथील महात्मा फुले पुतळा स्मारकापासून पोलीस आयुक्तालयापर्यंत आघाडीतर्फे शनिवारी मोर्चा काढण्यात आला. अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांना आघाडीतर्फे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अत्याचाराच्या घटनांतील नराधमांना त्वरित शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

छावा मराठा युवा संघाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा हेमलता लांडे पाटील, पिंपरी-चिंचवड उपाध्यक्षा मनीषा जाधव, पिंपरी-चिंचवड संपर्कप्रमुख स्वाती भोई, सारिका फुगे, राजश्री शिरवळकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र देवकर, जिल्हा उपाध्यक्ष नाना फुगे, पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष सूरज ठाकर, विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष गौरव धनवे, कार्याध्यक्ष विवेकानंद माने आदी या वेळी उपस्थित होते. सध्या शहरामध्ये भययुक्त व असुरक्षिततेचे वातावरण झालेले आहे. हिंजवडीलगतच्या कासारसाई व पिंपरी येथे माणुसकीला काळिमा फासणाºया घटना घडल्या. पिंपरी येथील रमार्ईनगर परिसरामधील घटनेत सातवर्षीय मुलीचा मृतदेह आढळला. लैंगिक अत्याचार झाला असल्याची शंका पोलिसांनी उपस्थित केली. या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच असे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना व्हावी. त्यासाठी आपण महिला अत्याचार संदर्भातील छोट्यात छोट्या घटनेकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. अत्याचार करणाºया नराधमांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी व महिला सुरक्षिततेसाठी आपण योग्य त्या उपाययोजना प्रस्थापित कराव्यात यातून अशा दुर्दैवी घटनांना नक्कीच आळा बसू शकेल, असे निवेदनात नमूद केले आहे.असुरक्षितता : गुन्हेगारीला आळा घालाशहर आणि परिसरात अल्पवयीन मुली आणि महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. अशा घटनांमधून महिलांसह बालकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. त्यातूनच ते दोषी पुढे बलात्कारासारखे मोठे गुन्हे करण्यासाठी पुढे सरसावतात. यामुळे अशा मनोवृत्तीच्या व्यक्तीवर योग्य कारवाई होणे गरजेचे आहे. एकीकडे आपण महिलांना पुरुषांबरोबरचा दर्जा असल्याचा दावा करतो व दुसरीकडे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करतो. त्यामुळे अशा प्रकारांना आळा बसविण्याची मागणी करण्यात आली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे