शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

भुताटकीमुळे प्रेक्षागृहाचे काम थंडावले, मांत्रिकाच्या विधीनंतर कामगार पुन्हा कामावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 20:48 IST

अंधश्रद्धेचा कळस गाठल्याच्या या घटनेने समाजात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. 

पिंपरी : थेट दवाखान्यात तेही डॉक्टरांच्या समक्ष रुग्ण महिलेला आजारातून बरे करण्यासाठी अंगारे धुपारे लावून मंत्र तंत्र विधी केले. मात्र असे अघोरी प्रकार सुरू असताना, महिला दगावली. पुरोगामी विचारांचा वारसा जपणा-या पुण्यात अंधश्रद्धा पसरविणारी घटना ताजी असताना, या घटनेपाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेच्या प्रेक्षागृहाचे नूतनीकरणाचे सुरू असलेले काम भुताटकीच्या भीतीने कामगारांनी बंद ठेवले. मृतात्म्याची शांती घालण्याच्या भावनेतून विधीवत पूजा केली. त्यानंतरच काम पुन्हा सुरू केले. अंधश्रद्धेचा कळस गाठल्याच्या या घटनेने समाजात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे प्रेक्षागृहाचे महापालिकेतर्फे नूतनीकरण सुरू आहे. स्थापत्य विषयक कामे संपली असून आता अंतर्गत सजावट आणि वातानुकूलित यंत्रणेचे काम सुरू आहे. वातानुकूलित यंत्रणेचे काम आनंद रेफ्रिजेटर या संस्थेला दिले आहे. प्रेक्षागृहाच्या आतील बाजूस काम करीत असताना अचानक महिलेचा आवाज आला, बांगड्या खळखळल्याचा आवाज येऊ लागला. असा आरडा ओरडा कंत्राटदार संस्थेकडे काम करणा-या कामगारांपैकी एकाने केला. भुताटकीचा प्रकार आहे, असे भासविल्याने कामगार भयभीत झाले. या ठिकाणी कामावर येण्यास कामगारांना भीती वाटू लागली.आठ दिवसांपासून कामगारांची अनुपस्थिती जाणवू लागली. त्यातील एकाने भूत, पिश्याच्च असल्याने विधीवत पूजा करून शांती घातली पाहिजे, तरच या ठिकाणी काम करता येईल, अशी उपाययोजना सूचविली. कामगारांनी एकत्रित येऊन मांत्रिकाला पाचारण केले. प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे, त्या ठिकाणी हळद, कुंकू, लिंबू, मिरची व अन्य पूजा साहित्य आणले. मांत्रिकाकरवी विधीवत कार्यक़्रम घेतल्यानंतर कामगारांच्या मनातील भीती दूर झाली. तब्बल आठ दिवस रखडलेले काम मांत्रिकाकरवी पूजा घातल्यानंतर पूर्ववत सुरू झाले आहे. अंधश्रद्धेपोटी विकासकामांना अडथळे येणे शहरासाठी अशोभनीय आहे. वैज्ञानिक क्रांतीच्या युगात पुण्यासारख्या शहरात अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असल्याबद्दल नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. 

कर्मचा-यांवर कारवाई महापालिकेच्या आचार्य अत्रे प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. आनंद रेफ्रिजिरेशन या संस्थेला वातानुकूलित यंत्रणा बसविण्याचे काम दिले आहे. त्यांच्याकडील कामगाराने अंधश्रद्धेपोटी भुताटकी घालविण्यासाठी मांत्रिकाला बोलावून पूजा घातली असल्याची चर्चा आहे.  ठेकेदाराने त्या कामगारास तातडीने कामावरून काढून टाकले आहे. महापालिकेच्या कामावर कसलाही परिणाम झालेला नाही. वातानुकूलित यंत्रणेचे काम आणखी दीड महिना सुरू राहील.  

- प्रवीण तुपेसह शहर अभियंता 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड