शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

चिंचोलीतील चर बुजविण्याची मागणी

By admin | Updated: June 25, 2016 00:22 IST

संत तुकाराममहाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत येत असून, चिंचोली येथील शनी मंदिर येथे विसावा असून, त्या ठिकाणी खोदण्यात आलेले लांबलचक

देहूरोड : संत तुकाराममहाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत येत असून, चिंचोली येथील शनी मंदिर येथे विसावा असून, त्या ठिकाणी खोदण्यात आलेले लांबलचक चर बुजवून टाकावेत, देहूरोड परिसरातील गतिरोधक काढून टाकावेत, तसेच सर्व परिसर स्वच्छता ठेवण्यात यावी व वारकऱ्यांची गैरसोय दूर करण्याची मागणी देहूगाव येथील श्री संत तुकाराममहाराज संस्थानच्या वतीने देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. पालखी सोहळा सोमवारी प्रस्थान ठेवत असून, मंगळवारी सकाळी मार्गस्थ होणार आहे. दुपारी चिंचोली येथील शनी मंदिर परिसरात दुपारचा विसावा राहणार आहे. शनी मंदिर परिसरात लांबलचक चर खोदण्यात आलेले असून, त्यामुळे विसाव्याच्या वेळी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. देहूरोड परिसरात पालखी मार्गावर विविध ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले आहेत. परिसरात स्वच्छता व साफसफाई करण्याची गरज असल्याचे पत्रात म्हटले आहे . बोर्डाच्या एका अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार चिंचोलीतील मोठे चर बुजविण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरच कामाला सुरुवात होणार असून, बोर्डाच्या हद्दीतील झेंडेमळा ते निगडी या संपूर्ण पालखी मार्गावर गेल्या दोन दिवसांपासून स्वच्छता करण्यात येत आहे.रस्त्यालगत असणारा सर्व कचरा, राडारोडा, प्लॅस्टिक कागद उचलण्यात येत आहेत. रस्त्यालगत असणारी लहान झाडे छाटणी करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. प्रस्थान सोहळा झाल्यांनतर काही वारकरी चिंचोली, झेंडेमळा येथे मुक्कामासाठी तसेच मंगळवारी चिंचोलीत विसावा असल्याने सकाळपासून आरोग्य विभागाचे कर्मचारी स्वच्छता ठेवण्यासाठी कार्यरत असणार आहेत. (वार्ताहर)