शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची शेणखताला मागणी वाढली

By admin | Updated: May 30, 2017 02:37 IST

कधीकाळी शेतकरी शेणखताच्या वापरातूनच भरघोस शेती उत्पादन घेत असे. मात्र, साधारणपणे १९७0 च्या दशकात शेतकरी

लोकमत न्यूज नेटवर्कमोशी : कधीकाळी शेतकरी शेणखताच्या वापरातूनच भरघोस शेती उत्पादन घेत असे. मात्र, साधारणपणे १९७0 च्या दशकात शेतकरी रासायनिक खते वापरू लागले. बागायती शेतीत तर त्याचा वारेमाप वापर होऊ लागला. गेल्या काही वर्षांत युरियाचा वापर अधिक होत होता. गेल्या दोन वर्षांत सर्वच रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने त्यांचा वापर सामान्य शेतकऱ्यांना परवडेनासा झाला आहे. त्यामुळे ते पुन्हा शेणखताच्या वापराकडे वळत असल्याचे पहावयास मिळत आहे. शहरात मोशी, चऱ्होली, डुडुळगाव, रावेत, चिखली, ताथवडे आदी गावांमध्ये अजूनही हिरव्यागार शेती होते. चऱ्होली, मोशी, आळंदी तसेच वडमुखवाडी परिसरात काही शेतकऱ्यांनी तर शेतातच गांडूळ खताचे डेपो तयार केले आहेत. तेथे शेणखताचा वापरही वाढू लागला आहे. कृत्रिम खताच्या किमती वाढल्याने शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खताच्या वापरास शेतकरी प्राधान्य देत आहेत. ट्रॅक्टरभर शेणखत खरेदी करून त्याची खेड, चाकण, शिक्रापूर, मंचर आदी भागांत विक्री करण्याचा व्यवसायही काहींनी थाटला आहे. ट्रकभर शेणखताची सहा ते साडेसात हजारांपर्यंत विक्री होत असून, हे खेत थेट शेतापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था व्यावसायिक करीत आहेत. यातून रोजगार निर्मितीही होत आहे. सध्या सर्वत्र खरीपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. पुन्हा का वाढली मागणी?पारंपरिक पद्धतीने तयार होणाऱ्या शेणखत निर्मितीकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस घटणाऱ्या पशुधनामुळे शेणखत दुर्मिळ होत चालले आहे. ४पर्जन्यमानातील अनियमितता, जनावरांच्या चाऱ्याबरोबर उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाई बघता पशुपालकांची मोठी पंचाईत होत असते. त्यामुळे त्यांनाही नाईलाजास्तव पशुधनाची विक्री करावी लागते. पशुधनाची संख्या घटत आहे. परिणामी शेणखताचाही तुटवडा भासत असून त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहे.