शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

...अन् रंगला गोमातेचा डोहाळ जेवण सोहळा; पिंपरीतील बाफना परिवाराची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 17:06 IST

मंगलमय वातावरणात 'लक्ष्मी आणि गौरी' या दोघी गो-मातांचा डोहाळ जेवण सोहळा चिंचवडगावातील अशोक बाफना यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देमंगलमय वातावरणात 'लक्ष्मी आणि गौरी' या दोघी गो-मातांचा डोहाळ जेवण सोहळा साजराभूत आणि भविष्यकाळ घडविणारी जननी गो-मातेस विनम्र अभिवादन करणे गरजेचे : बाफना

पिंपरी : स्थळ... चिंचवडगावातील अशोक बाफना यांचे निवासस्थान..., वेळ सायंकाळची...,  प्रवेशदाराशी काढलेली सुंदर रांगोळी..., घरातील मंडळींची कार्यक्रमासाठी सुरू असलेली लगबग..., नटून थटून आलेल्या सुवासिनी..., सनई-चौघड्याचे सुरू..., अशा या मंगलमय वातावरणात 'लक्ष्मी आणि गौरी' या दोघी गो-मातांचा डोहाळ जेवण सोहळा साजरा करण्यात आला.अंगावर हिरव्या रंगाचा झुल... गळ्यात फुलांच्या माळा... पायात पैंजण... या दोघी मायलेकींचे कौतुक का तर दोघींच्या डोहाळ जेवणाची जंगी तयारी करण्यात आली होती. मग काय महिला मंडळाने या दोन जीवांच्या लक्ष्मी आणि गौरीच्या भाळी कुमकुम तिलक लावून औक्षण करून पूजा केली. त्यांची मोठ्या प्रेमाने ओटी भरली. मिष्ठान्नासह आवडते खाद्य त्यांना भरविण्यात आले.बाफना म्हणाले, की हिंदु धर्मात गो-मातेला खूप महत्त्व आहे. जैन समाजातदेखील गो-मातेला अनन्य साधारण महत्त्व दिले असून तिचा सांभाळ केल्यास कुटुंबाला मिळणारे समाधान, ऊर्जा याविषयी महत्त्व सांगितले आहे. महाभारतामध्ये महर्षी गुरु वसिष्ठ ऋषींनी सुध्दा गो-मातेचे महत्त्व विषद केले आहे. तुप आणि दुध देणारी, तुपाची उत्पत्ती स्थान, तुप मिळवून देणारी, दुधा-तुपाची नदी जीच्यामुळे वाहते ती गो-माता माझ्या घरात सदा निवास करू दे, माझ्या हृदयात गाईचे तूप असू दे. संपूर्ण शरीरात तूप रहावे, मनातपण असावे, गो-माता माझ्या आजूबाजूस चारही दिशांना असाव्यात. मी गो-मातेच्या सहवासात सदासर्वकाळ असावे, असे सांगितले आहे. जैन समाजात गाईला महत्त्व असल्याने आपल्याकडेही एक गाय असावी. अशी इच्छा होती. परंतु तेशक्य होत नव्हते.त्यानंतर नगर जिल्ह्यातील नेवासे येथून एक गाय आणि वासरू घेतले. घरात आणले. त्यांचे लक्ष्मी आणि गौरी असे नामकरण केले. गोमातेमुळे स्थैर्य आल्याने या दोघींचे डोहाळ जेवण करण्याचा निर्णय घेतला आणि सोहळा साजरा केला. कार्यक्रमास शरद बोथरा, मदनलाल कर्नावट, किशोर चोपडा उपस्थित होते. बाफना म्हणाले, जिने संपूर्ण चराचर सृष्टीला व्यापून टाकले आहे, अशी ती भूत आणि भविष्यकाळ घडविणारी जननी गो-मातेस विनम्र अभिवादन करणे गरजेचे आहे.  'लक्ष्मी-गौरी' या दोन्ही मायलेकींची सुवासिनींनी पूजा करून डोहाळ जेवण केले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड