शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

देहूरोड : कंटेनर अडकल्याने झाली वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 01:16 IST

पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी दुपारी सव्वाच्या सुमारास बँक आॅफ इंडिया चौकात एलिव्हेटेड रस्ता व उड्डाणपुलाचे काम सुरू असलेल्या पहिल्या पिलरला कंटेनर धडला.

देहूरोड : पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी दुपारी सव्वाच्या सुमारास बँक आॅफ इंडिया चौकात एलिव्हेटेड रस्ता व उड्डाणपुलाचे काम सुरू असलेल्या पहिल्या पिलरला कंटेनर धडला. कंटेनर अडकल्याने वाहनचालकांची व स्थानिक ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली. पुलाच्या सिमेंट पिलरला वारंवार कंटेनर अडकत असतानाही रस्ते विकास महामंडळाच्या ठेकेदाराकडून उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने, असे प्रकार घडत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.बुधवारी दुपारी पुण्याकडून मुंबईच्या दिशेने निघालेला मालवाहू कंटेनर देहूरोड बाजार भागातील एलिव्हेटेड रस्ता व उड्डाणपुलाचे काम सुरू असलेल्या भागातील सेवा रस्त्यावरून जात होता. एलिव्हेटेड व उड्डाणपुलाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी बांधण्यात येत असलेल्या चौकात पहिल्या सिमेंट पिलरला धडकून अडकला. कंटेनर अडकल्याने जोरात आवाज झाला.त्याठिकाणी नागरिकांनी धाव घेतली. तोपर्यंत अर्ध्याहून अधिक कंटेनर पुलाच्या सिमेंट पिलरलाघासून पुढे जाऊन अडकून पडला होता.वाहनचालकांना मारावा लागला वळसाकंटेनर अडकल्याने मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली होती. कंटेनरच्या मागील उजव्या बाजूच्या सर्व चाकांची हवा कमी करून हळू-हळू पिलरला घासत चालकाने कंटेनर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; मात्र कंटेनर निघाला नाही. तोपर्यंत पुणे बाजूकडे वाहनांची मोठी रांग लागली होती. काही वाहने विरुद्ध दिशेने जाऊ लागल्याने वाहतूककोंडी झाली होती. इतर सर्व रस्त्यांवर वाहने जाऊ लागल्याने सर्वत्र वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे मुंबईकडे जाणाºया वाहनचालकांना व स्थानिकांना सोमाटणे, तळेगावकडे जाण्यासाठी मोठा वळसा घालून जावे लागत होते. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते मेहरबानसिंग तक्की यांनी देहूरोड वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश पवार यांना कळविल्यानंतर दोन वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला़ मात्र तोपर्यंत लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर पोलिसांनी संबंधित पुलाचे काम करणाºया ठेकेदाराची क्रेन आणून अडकलेला कंटेनर एक तासाने काढण्यात यश आले. गेल्या पाच महिन्यांत येथील महामार्गावर स्वामी विवेकानंद चौकात व बँक आॅफ इंडिया चौकात अशा पद्धतीने उड्डाणपुलाच्या पिलरला कंटेनर अडकण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. मात्र पुलाचे काम करणाºया ठेकेदाराकडून याबाबत काहीही उपाययोजना केली नसल्याचे उघड झाले असून, राज्य रस्ते विकास महामंडळाने संबंधित उड्डाणपूल व एलिव्हेटेड रस्त्याचे काम करणाºया ठेकेदारास तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करणेबाबत सूचना द्याव्यात, अशी मागणी वाहनचालकांनी व स्थानिकांनी केली आहे.

टॅग्स :Accidentअपघात